Elon Musk
Elon Musk Sakal
ग्लोबल

लोकसंख्या वाढल्यास हरकत नाही, परंतु कमी झाल्यास धोका : मस्क

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आजच्या काळात लहान कुटुंब असणे चांगले मानले जाते. यासाठी अनेक जण एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटुंब नियोजन (Family Planning) करण्याकडे प्राध्यान्य देत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर, अनेक सरकारं कोट्यवधी रुपये खर्च करून मोठमोठ्या मोहिमा राबवून 1 किंवा 2 मुले जन्माला घालण्याचा सल्लाही देत आहेत. असे करण्यामागे वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील अन्न संकट हे आहे. परंतु, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांचे याबाबत वेगळे मत आहे. ते म्हणतात की, अधिक मुले जन्माला घालणे म्हणजे पर्यावरणाची हानी करणे या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. (Elon Musk Comment On Population)

एलॉन मस्क यांना स्वतःची ७ मुले आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की, जे लोक पर्यावरणाची हानी होईल हे लक्षात घेऊन कमी मुले जन्माला घालतात किंवा होऊ देत नाही हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. मस्क म्हणाले की, “काही लोकांना वाटते की, लोकसंख्या कमी असणे पर्यावरणासाठी चांगले आहे. परंतु, लोकसंख्या दुप्पट झाली तरी पर्यावरणाचे काहीही होणार नाही. मला पर्यावरणाशी संबंधित अनेक गोष्टी माहित आहेत असे म्हणत जपानमध्ये जन्मदर सर्वात कमी असल्याचे ते म्हणाले. मानवी सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी मुलं जन्माला घालणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एलॉन मस्क यांनी त्यांचा मुद्दा अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकन लोकांच्या घटत्या प्रजननक्षमतेचा आलेख शेअर केला असून, अमेरिकेतील जन्मदर 50 वर्षांच्या किमान शाश्वत पातळीपेक्षा कमी असल्याचे दाखवले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी घटत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही त्यांनी यासंदर्भात अनेक विधाने केली आहेत. जर पृथ्वीवर माणसांना राहण्यासाठी पुरेशी जागा नसेल, तर मंगळावर लोकांसाठी पुरेशी जागा नक्कीच असेल असे विधान मस्क यांनी यापूर्वी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT