Elon Musk esakal
ग्लोबल

Elon Musk: भोजपुरी गाणे पोस्ट करणाऱ्या तोतया इलॉनचं अकाउंट सस्पेंड; विनोद पडला महागात

इलॉनच्या नावावर ट्विट करणाऱ्या व्यक्तीचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय

सकाळ डिजिटल टीम

Twitter Fake Account: ट्विटरच्या डिलनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला इलॉन मस्क हिंदी आणि भोजपुरी भाषेतून ट्विट करतोय अशी खळबळ सगळीकडे उडाली होती. मात्र हे सगळे ट्विट इलॉन मस्कच्या नावावर इयान वुलफोर्ड नावाचा तोतया इलॉन करत असल्याची माहिती पुढे आली. इलॉनच्या नावावर ट्विट करणाऱ्या या व्यक्तीची दखल घेत आता त्याचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय.

इयान वुलफोर्ड सतत मस्कच्या नावाने ट्विट करत होता, त्यामुळे त्याचं अकाउंटच आता सस्पेंड करण्यात आलंय. शनिवारी सकाळपासून इलॉनचे हिंदी आणि भोजपुरी भाषेतील ट्विट चर्चेचा विषय बनले होते. ट्विटर यूजर इयान वुलफोर्ड ((Ian Woolford) ने त्याचे नाव बदलत इलॉन मस्क केले होते. त्यामुळे अनेकांना मस्क खुद्द हिंदी आणि भोजपूरी भाषेत ट्विट करत असल्याचे वाटले.

कोण आहे इयान वुलफोर्ड?

हा तोतया इलॉन मस्क नेमका आहे तरी कोण असा अनेकांना प्रश्नही पडला असेल. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील 'ला ट्रोब युनिवर्सिटी'मध्ये तो साउथ एशियन कोर्स शिकवतो. या व्यक्तीस केवळ हिंदीच नाही तर उर्दू, संस्कृत, भोजपुरी आणि पर्शियन भाषेचीही माहिती आहे. त्याच्या हिंदी आणि उर्दू ट्विटने मात्र सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT