elon musk new social media platform said on twitter  Sakal
ग्लोबल

Elon Musk सुरू करणार नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? ट्वीटरवर दिले संकेत

सकाळ डिजिटल टीम

टेस्लाचे सीईओ एलन मस्क आता स्पेस आणि ऑटोमोबाईल्स नंतर सोशल मीडिया क्षेत्रात देखील एंट्री करण्याचे संकेत दिले आहेत. मस्क हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहेत आणि वेळोवेळी केलेल्या त्यांच्या ट्विटमुळे ते सतत चर्चेत देखील असतात. सोशल मिडिया क्षेत्रात प्रवेशाबाबत आपण विचार करत असल्याचे त्यांनी स्वतः सांगितलं आहे.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. शनिवारी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. मस्क ट्विटरवर एका वापरकर्त्याला रिप्लाय दिला होता. ज्यामध्ये त्यांना ओपन सोर्स अल्गोरिदम चा समावेश असणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केला आहे का असे विचारले होते. ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिले जाईल आणि जिथे प्रचार कमी असेल. यावर उत्तर देत मस्क यांनी ते गांभिर्याने विचार करत असल्याचे सांगितले होते.

मस्क यांनी एक दिवस अगोदर, एक ट्विटर पोल पोस्ट केला होता ज्यामध्ये मस्क यांनी कार्यक्षम लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते यावर तुमचा विश्वास आहे का? या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असतील. कृपया काळजीपूर्वक मतदान करा. यावर 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान करून नाही असे सांगितले होते.

विशेष म्हणजे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात मोठ भाषण स्वातंत्र्याचे दावे करणारे अनेक प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब सारखी लोकप्रियता मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल, गेटर, पार्लर आणि कु अशा अनेक प्लॅटफॉर्मची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT