Elon Musk Twitter Announcement  sakal
ग्लोबल

ट्विटर डील तात्पुरती स्थगित; मस्क यांनी सांगितलं कारण

मस्क यांच्या या माहितीनंतर प्री मार्केटमध्ये ट्विटरचे शेअर्स गडगडले

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर' प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क विकत घेणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे. पण यामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. ट्विटर विकत घेण्याची ही डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, मस्क यांनी स्वतः ही माहिती दिली. (Elon Musk says 44 billion Twitter deal on hold)

मस्क यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितलं की, "ट्विटरवर सध्या ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत, या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्यानं ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे"

मस्क यांच्या या माहितीनंतर याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले. यामुळं ट्विटरचे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये १७ टक्क्यांनी घसरले आहेत.

दरम्यान ट्विटरनं नुकतंच म्हटलं होतं की, जोपर्यंत मस्कसोबतचा करार अंतिम होत नाही तोपर्यंत कंपनीला अनेक जोखमींचा सामना करावा लागणार आहे. ज्यामध्ये जाहिरातदार, भविष्यातील योजना आणि रणनीतीबाबत संभाव्य अनिश्चितता यांचा समावेश आहे. मस्क यांनीही ट्विटरच्या नियंत्रण धोरणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, Twitter च्या अल्गोरिदमनं ट्वीट्स सार्वजनिक होण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि जाहिरात करणार्‍या कॉर्पोरेशनच्या सेवेवर जास्त शक्ती खऱ्च करु नये.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच मस्क यांनी सांगितलं होतं की, जेव्हा ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतील तेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरील बंदी मागे घेतील आणि साईटचं नियंत्रण कमी करण्याचा त्यांचा हेतू दाखवून देतील. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, निरपेक्षतावादी आणि भाषण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते मानले जातात. त्यामुळं प्लॅटफॉर्मवरून 'स्पॅम बॉट्स' काढून टाकणं हे त्यांचं प्राधान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: एका फोनने भाषाच बदलली! मुख्यमंत्री फडणवीसांचा पडळकरांना फोन, म्हणाले...

Raj Thackeray: पक्षफुटीनंतर पहिल्यांदा राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद, कानमंत्र देत म्हणाले...

Latest Marathi News Updates : पुण्यात पवारांच्या पक्षाचं पडळकरांविरोधात आंदोलन

Who is Sanjog Gupta? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फैलावर घेणारे संजोग गुप्ता कोण? जगासमोर शेजाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं अन् लाज काढली...

Delhi University Election Result : दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ‘ABVP’ने पुन्हा एकदा फडकवला भगवा!

SCROLL FOR NEXT