elon musk says twitters ad revenue has dropped by 50 percent social media Sakal
ग्लोबल

Elon Musk : ट्विटरला भासतेय पैशांची चणचण; कर्जाचा बोजा वाढल्याचेही एलॉन मस्कने केले स्पष्ट

एका युजरने व्यवसायासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शनिवारी त्यांनी यासंबंधीचे ट्विट केले.

सकाळ वृत्तसेवा

सॅन फ्रॅन्सिस्को : जाहिरातींचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्यामुळे ट्विटरला अजूनही पैशांची चणचण भासत असल्याचे यांनी सांगितले. एका युजरने व्यवसायासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शनिवारी त्यांनी यासंबंधीचे ट्विट केले.

कंपनीवर सध्या कर्जाचा मोठा बोजा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाकी कोणत्याही विलासापेक्षा पैशांचा स्रोत बळकट करणे, ही सध्याची आवश्यक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून काही महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी कंपनी सोडल्याने तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे, मजकुरासंबंधीचा दृष्टिकोन बदलल्याने कंपनीचे बरेच मोठे जाहिरातदार द्विधावस्थेत होते.

त्यांना आश्वस्त करण्याचा मस्क यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात अनेक नामांकित व्यक्तींवर बंदी घालण्यात आली होती. त्यांची बंदी उठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक जुने जाहिरातदारही कंपनीकडे पुन्हा वळल्याचेही ते म्हणाले.

कंपनीने मे महिन्यात लिंडा याकारिनो यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामावर रुजू करून घेतले. त्यांनी ‘एनबीसी युनिव्हर्सल’मध्ये कार्यकारी पदावर काम केले आहे. तसेच त्यांचे औद्योगिक जगताशीही चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

SCROLL FOR NEXT