elon musk latest news) google
ग्लोबल

कामासंदर्भात मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवत दिला इशारा

टेस्लामध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या या ईमेलला गोपनीय मानले जात आहे

सकाळ डिजिटल टीम

टेस्लामध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या या ईमेलला गोपनीय मानले जात आहे

कोरोना काळात बऱ्याच कंपनींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली होती. मात्र आता अनेक देशातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा परिस्थिती सुरळीत होऊ लागली आहे. या काळात अनेक कार्यालये आणि मोठ्या कंपनींनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. (elon musk latest news)

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने आता जगातील नामांकित अॅपल आणि गुगल अशा कंपन्याही सुरु करण्यात आल्या आहे. या यादीत आता टेस्लानेही कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवले आहे. कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला असून कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या तासा बद्दल माहिती दिली आहे. मस्क यांनी या ई-मेल मधून कर्मचाऱ्यांना कामच्या तासांबद्दल इशारा दिला आहे.

एलन मस्क यांनी आपल्या ई-मेल मध्ये म्हटले की, रिमोट वर्क आता स्वीकारणे योग्य नाही. जर कुणाला रिमोट वर्क करायचे असेल तर त्याला ऑफिसला यावे लागणार आहे. तसेच कार्यालयात कमीत कमी आठवड्याभारात ४० तास काम करावे लागणार आहे. परंतु, जर कोणी कर्मचारी ४० तास काम करण्यास तयार नसेल तर त्या व्यक्तीने टेस्ला कंपनीला सोडून जावे, असा इशारा मस्क यांनी ई-मेलमधून दिला आहे.

कंपनीची संबंधित माहिती असल्याने टेस्लामध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या या ईमेलला गोपनीय मानले जात आहे. परंतु आता ही माहिती समोर आली आहे. मस्क यांनी दोन ई-मेल पाठवले आहेत. पहिल्या ई-मेलमध्ये आदेश आणि काही अटी सांगितल्या आहेत. या अंतर्गत काही कर्मचाऱ्यांना रिमोट वर्क करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना टेस्लाला ऑफिसमध्ये यावे लागणार असून वरिष्ठ कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत ऑफिसमध्ये यावे लागणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT