Elon Musk Twitter esakal
ग्लोबल

Twitter: 'मस्का' लावणाऱ्या युजर्सना 'एलॉन'चं वेसण; तुमचे फॉलोअर्स ढासळणार

संतोष कानडे

नवी दिल्लीः एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. सुरुवातीलाच अनेक कर्मचाऱ्यांवर गंडांतर आलेलं. शिवाय फेक अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. आता युजर्सचे फॉलोअर्स घटणार आहेत.

ट्विवर सध्या बरीच बनावट खाती बंद करणार आहे. स्पॅम आणि स्कॅम खाती साफ करत आहोत, असं मस्क यांनी आज ट्विट करुन सांगितलं. त्यामुळे अनेकांच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येईल.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

ट्विटर ब्लूसाठी यूजर्सला पैसे द्यावे लागणार आहेत. भारतात ट्विटर ब्लूची किंमत ७२० रुपये असू शकते. अमेरिका व इतर देशांमध्ये यासाठी ८ डॉलर्स मोजावे लागतील. नवीन सर्व्हिस व्यतिरिक्त व्हर्च्यूअल जेलवर देखील काम सुरू आहे. रिपोर्टनुसार, यूजर्सने ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्यास व्हर्च्यूअल जेल होईल. या अंतर्गत यूजर्सला प्लॅटफॉर्मवर कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी करावी लागणार नाही.

'ब्लू टिक'चा रंग बदलणार

ट्विटरवर कंपन्यांसाठी गोल्ड चेक मार्क, सरकारसाठी ग्रे आणि सर्वसामान्य यूजर्ससाठी ब्लू टिक मार्क जारी केले जाईले. तसेच, सर्व व्हेरिफाइड अकाउंटचे पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. याआधी ट्विटरवर राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सेलिब्रेटींची ओळख पटावी यासाठी ब्लू टिक जारी केले जात असे. Twitter Blue ला पुन्हा सुरू करण्यास उशीर होत असल्याबाबत मस्क यांनी माफी देखील मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT