Canada Freedom Convoy 2022
Canada Freedom Convoy 2022 esakal
ग्लोबल

ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे कॅनडाच्या राजधानीत आणीबाणीची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

ओटावा : कॅनडाची (Canada) राजधानी ओटावा(Ottawa) ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. रविवारी ओटावा शहराचे महापौर जिम वाॅटसन यांनी आणीबाणी घोषित केली. ते म्हणाले, शहराला घेरावा घालून होत असलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणीबाणी घोषित केल्याने हे स्पष्ट झाले आहे, की किती गंभीर धोका लोकांच्या सुरक्षा आणि संरक्षणाला असेल. अशा स्थितीत काही कडक पावले उचलण्याची गरज आहे. ज्याने लोकांना मदत मिळू शकेल. शहराला आंदोलकर्ते ट्रल चालकांनी २८ जानेवारीपासून घेरले आहे. आंदोलनकर्त्यांनी फ्रिडम काॅनवाॅय २०२२ च्या (Freedom Convoy 2022) नावाने आंदोलन सुरु केले आहे. (Emergency Declared In Canada Capital Ottawa)

जोपर्यंत सरकार कोरोना लस सक्तीचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील असे आंदोलकर्त्यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनासारख्या संकटाशी तोंड देण्यासाठी लाॅकडाऊनसारखे उपायांना त्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) हे ही आंदोलनामुळे राजधानी सोडून गोपनीय स्थळी निघून गेले होते. आतापर्यंत ट्रकचालकांनी ओटावा खाली करण्याचे संकेत दिलेले नाही. दुसरीकडे महापौरांनी या प्रकरणी केंद्र सरकारला लक्ष देण्याची मागणी केली आहे.

ओटावाचे महापौर म्हणाले, आता लक्ष देण्याची गरज

एक वृत्तवाहिनीशी बोलताना वाॅटनस म्हणाले, आतापर्यंत या आंदोलनाची दखल घ्यायला हवी होती. केंद्र सरकारने मध्यस्थी करुन ते संपवले पाहिजे. कारण आता आंदोलनाचे लोण देशभर पसरत चालले आहे. गेल्या आठवड्यात आंदोलनकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर जस्टिन ट्रुडो गुप्त स्थळावरुन काम करित आहेत. रविवारी फ्रिडम काॅनवाॅय निदर्शनादरम्यान सात लोकांना अटक केले गेले आणि अनेक वाहने आणि इंधन जप्त करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT