Emmanuel Macron_PM Modi 
ग्लोबल

Emmanuel Macron: फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी भारताचे मानले आभार, हिंदीतून केलं ट्विट; म्हणाले, निर्णायक भूमिका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी फ्रेन्च सैन्याच्या परेडमध्ये सहभागी झाले. या ठिकाणी मोदींचं चांगल स्वागत झालं. या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी PM मोदींचे या सोहळ्याचा उपस्थित राहिल्याबद्दल चक्क हिंदीत ट्विट करत आभार मानले. तसेच भारताचं त्यांनी विशेष शब्दांत कौतुक केलं. (Emmanuel Macron French President thanked India tweeted in Hindi)

मॅक्रॉन यांनी हिंदीत ट्विट करत म्हटलं की, "जगाच्या इतिहासात एक विशालकाय, भविष्याबाबत निर्णायक भूमिका निभावणारा देश, रणनीतीतील सहकारी मित्र असलेल्या भारताला या वर्षी १४ जुलैच्या परेडमध्ये पाहुणा म्हणून सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे" (Latest Marathi News)

मोदींना मिळाला फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आलं आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. (Marathi Tajya Batmya)

भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा

दरम्यान, पॅरिस इथं अनिवासी भारतीयांशी बोलताना PM मोदी म्हणाले, "ज्या विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण अर्थात मास्टर्स डिग्री करायची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आता दीर्घकालीन पाच वर्षांचा व्हिसा देण्यात येणार आहे, अशी मी घोषणा करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT