Extra Marital Affair Esakal
ग्लोबल

Extra Marital Affair : ‘पती पत्नी और वो’, भारतात किती लोकांचे आहे विवाहबाह्य संबंध? संशोधनात धक्कादायक खुलासा!

भारतात तब्बल २० लाख लोकांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

पती पत्नीच्या नात्यात दुरावा एकाच कारणाने येतो. तो म्हणजे जोडीदाराचे बाहेर सूत जुळलेले असणे. भारतातील संस्कृतीप्रीय लोक यात कमी नाहीत. भारतात तब्बल २० लाख लोकांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.  

एका फ्रेंच डेटिंग ऍपने केलेल्या सर्वेनुसार भारतात 20 लाखांहून अधिक लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. हे आकडे फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग ऍप ग्लीडेनच्या सर्व्हेनुसार सांगण्यात आले आहेत. 2022 मध्ये या ऍपचे 10 मिलियन वापरकर्ते पूर्ण झाले आहेत. यातील सुमारे 20 टक्के वापरकर्ते भारतीय आहेत. म्हणजे सुमारे 20 लाख भारतीय या ऍपवर डेटिंग करत आहेत.

केवळ श्रीमंत लोक यात आहेत असे नाही तर छोट्या शहरातील लोक सर्वसामान्य लोकांचेही विवाहबाह्य संबंध आहेत. इंजिनियरपासून डॉक्टरांपर्यंत सर्वच या ऍपचा एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग वापर करत आहेत.

या ग्लीडेन अॅपनुसार, 20 लाख वापरकर्त्यांमध्ये 60 टक्के पुरूष तर 40 टक्के महिला आहेत. या कंपनीचे जगभरात वापरकर्ते आहेत. त्यापैकी 20 टक्के युजर्स फक्त भारतातील आहेत आणि यापैकी 40 टक्के महिला आहेत.

हे ऍप अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी नवीन करायचे आहे.
या ऍपवर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आहेत. महिलांचे सरासरी वय 26 वर्षे आहे तर पुरुषांचे वय 30 वर्षे आहे. इतकेच नाही तर मोठ्या संख्येने गृहिणीही या ऍपचा वापर करत आहेत. ऍपवर महिलांसाठी सेफ्टी फीचर्स आहेत, त्यामुळे महिलाही त्याचा भरपूर वापर करत आहेत.

डेटिंग ऍपवरील 44 टक्के लोक 20 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांतील आहेत. तर सुमारे 66 टक्के लोक 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरातील आहेत. इंजिनिअर्स, ऑफिसर्स, डॉक्टर हे फ्रेंच डेटिंग ऍप वापरत आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील लोकांचाही ऍपवर समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT