Fake News Man Did NOT Fake Being Deaf and Dumb for 62 Years to Avoid Listening to Wife 
ग्लोबल

पत्नीसोबत तब्बल 62 वर्षे राहिला मूकबधीर बनून....

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : पती-पत्नीच्या नात्यामध्ये शब्दाने शब्द वाढत जातो अन् भांडणाचे रुपांतर घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचते, अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला नेहमीच वाचायला मिळतात. पण, दोघांच्या नात्यामध्ये भांडणच नको म्हणून तो तब्बल 62 वर्षे पत्नीसोबत मूकबधीर म्हणून राहिला. एवढी वर्षे संसार केल्यानंतर तो मूकबधीर नसल्याचे उघड झाले अन् घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली.

अनैतीक प्रेमसंबंध, मानसिक अथवा शारिरीक छळ यामुळे अनेकांचे घटस्फोट हात असल्याचे पहायला मिळते. पण, या घटस्फोटाचे कारण समल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरातील ही अनोखी घटना आहे. डोरोथी (वय 80) व बेरी डावसन (वय 84) यांनी तब्बल 62 वर्षे संसार केला. त्यांना सहा मुले, सूना, जावई व 13 नातवंडे आहेत. पण, डोरोथी यांनी बेरी डावसान यांच्यापासून आपल्याला घटस्फोट हवा आहे, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. घटस्फोटाचे कारण ऐकल्यानंतर न्यायालयही अवाक झाले.

डोरोथी आणि बेरी 62 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. या सहा दशकांच्या कालावधीत बेरी यांनी डोरोथीसमोर एक शब्दही उच्चारला नाही. आपण मूकबधीर असल्याचे त्यांनी सर्वांना भासवले. पतीची भाषा समजण्यासाठी डोरोथी आणि त्यांची मुले सांकेतिक भाषा शिकल्या. बेरी यांना बोलता-ऐकता येत नाही, यावर सर्वांचा विश्वास बसला होता. मात्र, एके दिवशी त्यांचे बिंग फुटले आणि कुटुंबाच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली.

बेरी म्हणाले, 'पत्नीचे ऐकावे लागू नये, म्हणून मूकबधीर असल्याचे सोंग घेतले होते. मूकबधीर असल्याची एवढी सवय झाली होती की याबद्दल कोणालाही शंकाही आली नाही. पण, सत्य कधीही लपून राहात नसते. अखेर वस्तुस्थिती समोर आली. आपल्याला पत्नीला दुखावण्याचा किंवा फसवण्याचा हेतू नव्हता. हेच 62 वर्षांच्या संसाराचे गुपित आहे.'

बेरी यांच्या वकिलाने खरी वस्तूस्थिती न्यायालयात सांगितली. मात्र, डोरोथी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकसान भरपाई, पोटगी आणि काही वस्तूंची मागणी केली आहे. पण, दोघे न्यायालयात समोरासमोर आल्यानंतर काय 'बोलणार' याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दरम्यान, याबाबतचे वृत्त सोशल मीडियासह विविध प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केले. पण, याबाबतची खरी माहिती घेण्याचा प्रयत्न एका वृत्तसंस्थेने घेतला असता हे वृत्तच खोटे असल्याचे अखेर उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रिक्षावाल्या लेकाची माय! आईनं सांगितली पोराच्या प्रेमाची कहाणी; औषधाला पैसे नसतात तेव्हा...

'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर ऑईल व काॅईल सह साहित्याची चोरी

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

SCROLL FOR NEXT