Falling crude oil prices Falling crude oil prices
ग्लोबल

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वेगाने वाढणाऱ्या तेलाच्या किमतींनी जगाची चिंता वाढवली होती. तेलाच्या किमती वर्षांमध्ये प्रथमच प्रति बॅरल शंभर डॉलरच्या वर गेल्या. परंतु, WTI कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी (ता. १५) पाच टक्क्यांहून अधिक घसरून (Falling crude oil prices) शंभर डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या. कच्च्या तेलाच्या बाजारातील १४ वर्षांची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आठवडाभरानंतर आता दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.

एबीएस न्यूजनुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीबद्दल वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना तेलाच्या मागणीबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. तेल बाजारात करार ५.७ टक्क्यांनी घसरून ९७.१३ डॉलरवर (Falling crude oil prices) आला, तर ब्रेंट सहा टक्क्यांनी घसरून १००.५४ डॉलरवर बंद झाला.

रशियाने (russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर गुंतवणूकदारांना तेलाच्या पुरवठ्याची चिंता होती. यासोबतच अमेरिका आणि ब्रिटनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. रशिया हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे चीनने रविवारी तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र असलेल्या शेनझेनमध्ये लॉकडाऊन (lockdown in china) जाहीर केले. या शहराची लोकसंख्या एक कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये कोविड संसर्ग वेगाने पसरत आहे. चीन हा जगातील दुसरा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे.

लॉकडाऊनच्या घोषणेमुळे तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील (ukraine) शांतता चर्चेवर बाजाराची आशा टिकून आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेमुळे तेल पुरवठा कमी खंडित होण्याची अपेक्षा आहे, असे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बँकिंग ग्रुपचे डॅनियल हाइन्स म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Uruli Kanchan : दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई; सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

फक्त संपत्तीतच नाही तर वयानेही विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ; दोघांच्या वयात किती आहे अंतर?

SCROLL FOR NEXT