ग्लोबल

कमरेवर हात ठेवून दोन पायांवर पळतो हा सरडा; पाहा मजेशीर व्हिडीओ

शर्वरी जोशी

सरडा हा सरपटणारा प्राणी कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. जगात सरड्याचे अनेक विविध प्रजाती आढळून येतात. यात आपल्याला काही मोजक्याच ठावूक आहेत. विशेष करुन रंग बदलणारा सरडा साऱ्यांनाच ठावूक आहे. चार पायांवर धावणारा सरडा बऱ्याचदा त्याचे रंग बदलतो. मात्र, दोन पायावर चालणारा किंवा पिसारा फुलवणारा सरडा कधी पाहिला किंवा त्याच्याविषयी काही ऐकलं आहे का? सध्या सोशल मीडियावर पिसारा फुलवून आणि दोन पायांवर धावणाऱ्या एका सरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @SDG2030 या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला आहे.

ट्विटरवर बऱ्याचदा काही भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी शेअर झालेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.  या व्हिडीओमध्ये एक सरडा चक्क कमरेवर हात ठेवून दोन पायांवर धावत आहे. तसंच त्याच्या मानेपासून पोटापर्यंतच्या भागावर एक पिसारा दिसून येत आहे. इतकंच नाही तर तो एका दगडावर उडी मारून तेथेच उभा राहतो.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा सरडा चांगलाच चर्चेत आला असून त्याच्याविषयी विविध चर्चा रंगल्या आहेत. इतकंच नाही तर हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.  हा व्हिडीओ जवळपास  ३७ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

जाणून घ्या या सरड्याविषयी

या सरड्याला फॅन थ्रोटेड लिझर्ड असं म्हटलं जातं. या सरड्याच्या पाच नव्या प्रजाती असून तो भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये जास्त आढळून येतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : मुलुंड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

Pune Kolhapur Highway accident : पुणे -कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT