finland. 
ग्लोबल

फिनलँड जगातील सर्वांत आनंदी देश; पाकिस्तानने भारताला टाकले मागे  

सकाळन्यूजनेटवर्क

कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला. असा एकही देश उरला नाही, जिथे कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलं. एकूणच कोरोना महामारीने सर्वांच्या आयुष्यात कमी-जास्त प्रमाणात दु:ख आणले. असे असले तरी सर्वात सुखी देशांच्या यादीमध्ये जास्त काही फरक पडलेला नाही. फिनलँड सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फिनलँडला जगातील सर्वांत सुखी देशाचा मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत 149 देशांचा समावेश करण्यात आला होता. 

यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यामध्ये गेल्या तीन वर्षातील सरासरी डेटा घेतला जातो. गेल्या 9 वर्षापासून हा रिपोर्ट जारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा या यादीमध्ये यूरोपीय देशांचा दबदबा पाहायला मिळालाय. फिनलँडनंतर या यादीत डेन्मार्कने दुसरे स्थान मिळवले आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी स्थान मिळवलं आहे. 

न्यूझीलँडची यावेळी एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी आहे. पहिल्या 10 देशांमध्ये केवळ न्यूझीलँडला स्थान मिळू शकलेले आहे. जर्मनीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून तो 17 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर गेला आहे. फ्रान्सचीही दोन अकांनी सुधारणा झाली असून 21 व्या स्थानावर पोहोचला आहे. ब्रिटेन 13 व्या स्थानावरुन 17 व्या स्थानी गेला आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश अमेरिका 19 व्या स्थानी आहे. 

आफ्रीकेचे देशे लेसोथो, बोत्सवाना, रवांडा आणि झिम्बाब्वे यादीमध्ये सर्वात खालच्या स्थानी आहेत. अफगाणिस्तान जगातील सर्वात दु:खी देश आहे. महामारीचा परिणाम जाणून घेण्यासाठी मागील वर्षाच्या डेटासोबत तुलना करण्यात आली, यात दिसून आलं की एक तृतीयांश देशांमधील लोकांमध्ये नकारात्मकता वाढीस लागली आहे. तर 22 देशांमध्ये सकारात्मकता वाढली आहे. भारताला या यादीत 139 वे स्थान मिळाले आहे. त्यामुळे दु:खी देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी आहे. चीन या यादीत 85 व्या स्थानी आहे. पाकिस्तानचा यादीत 105 वा नंबर असून नेपाळ 87 व्या स्थानी आहे. बांगलादेश 101 व्या स्थानी, तर श्रीलंका 129 व्या स्थानी आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT