Finland-Sweden NATO Membership e sakal
ग्लोबल

फिनलँड, स्वीडनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन-रशियाचं युद्ध (Ukraine Russia War) अद्यापही सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षेच्या चिंतेने मोठं पाऊल उचललं आहे. फिनलँड आणि स्वीडनने (Finland And Sweden) जगातील सर्वात मोठ्या लष्करी युतीमध्ये सामील होण्यासाठी अधिकृतपणे अर्ज केला आहे, असं NATO चे सरचिटणीस जेन्स स्लोल्टनबर्ग यांनी सांगितले.

फिनलँड आणि स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्याच्या विनंतीचे मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही आमचे सर्वात जवळचे भागीदार आहात. आमच्या सुरक्षेसाठी हे अधिक चांगलं आहे, असं स्टॉल्टनबर्ग यांनी स्वीडन आणि फिनलँडच्या अर्जानंतर माध्यमांसोबत बोलताना सांगितले. या प्रक्रियेला सुमारे दोन आठवडे लागतील अशी अपेक्षा आहे. पण, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी फिनलँड आणि स्वीडनच्या नाटोमध्ये सामील होण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आक्षेप माग घेतले आणि प्रवेशाची चर्चा सुरूच राहिली तर दोन्ही देश काही महिन्यात नाटोचे सदस्य होऊ शकतात. या प्रक्रियेसाठी आठ ते दहा महिने लागतात. पण, दोन्ही देशांना रशियायाचा धोका आहे. त्यामुळे नाटोला तत्काळ सूत्रं हलवावे लागतील, असंही बोललं जात आहे.

दोन्ही देशाच्या नाटोमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावर कॅनडाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. नाटो काही दिवसांत त्यांच्या प्रवेशाला मान्यता देण्याची शक्यता आहे, असं कॅनडानं म्हटलं आहे. तसेच नाटोच्या विस्ताराच्या महत्त्वावर सर्व सहयोगी सहमत आहेत. आपण एकत्र उभे राहिले पाहिजे आणि आपण सर्व सहमत आहोत की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. याचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं नाटोचे प्रमुख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT