covid patient
covid patient 
ग्लोबल

चीनच्या आधी या देशात सापडला होता कोरोना

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस, ता. २ (पीटीआय): कोरोना संसर्गाबाधित असणारा पहिला रुग्ण हा चीनच्या वुहानअगोदर युरोपमध्ये सापडला होता, असा खळबळजनक खुलासा फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. युरोपमध्ये १६ नोव्हेंबर २०१९ रोजी कोरोनाबाधित रुग्ण होता, असा दावा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या एका रुग्णालयाने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीतील रुग्णालयात तापेचे आजार असणाऱ्या २५०० हून अधिक एक्स रे रिपोर्टचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून खळबनजनक माहिती समोर आली आहे. 
केवळ नोव्हेंबरमध्येच दोघांच्या एक्स् रे रिपोर्टमधून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्थात त्यावेळी डॉक्टरांना कोरोना संसर्गाची माहिती फारशी नव्हती. कॉलमॉर येथील अल्बर्ट श्‍वित्झर रुग्णालयाचे डॉक्टर मायकेल श्‍मिट आणि त्यांच्या पथकाने म्हटले की, आतापर्यंत युरोपातील जे देश कोरोना शून्य असल्याचा दावा करत होते, त्याला काही अर्थ नाही. ते दावे चुकीचे आहे. चीनच्या वुहानमधील कोरोनाबाधित हा पहिला रुग्ण नसावा, अशी शक्यता पथकाने व्यक्त केली आहे. कारण ही बाधा नोव्हेंबरमध्येच युरोपमध्ये येऊन ठेपली होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये कोरोनेचे १,९० हजार रुग्ण असून त्यापैकी २८,८३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत फ्रान्सचा जगात क्रमांक आठवा लागतो. 

इटलीत १७८ नवे रुग्ण 
रोम: इटलीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १७८ नवीन रुग्ण आढळले असून २७ फेब्रुवारीनंतर प्रथमच एवढ्या कमी संख्येने रुग्ण सापडले आहेत. इटलीत कोरोनाने हाहा:कार माजवला होता आणि आतापर्यंत या आजाराने ३३ हजार जणांचा बळी घेतला आहे. तसेच बाधितांची संख्या २ लाखांवर पोचली आहे. यादरम्यान इटलीतील आघाडीच्या डॉक्टरांनी देशातील कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याचे म्हटले आहे. पूर्वीइतका कोरोना आता विनाशकारी राहिला नसल्याचे म्हटले आहे. लोंबार्डीच्या सॅन रॅफेल रुग्णालयाचे प्रमुख अल्बर्टो जंग्रिलो म्हणाले की, शास्त्रियदृष्ट्या कोरोना आता इटलीत राहिलेला नाही. गेल्या दहा दिवसातील स्थितीचा आढावा घेतल्यास कोरोना आता कमकुवत झाला असल्याचे म्हटले आहे. 

इराणमध्ये पुन्हा परिस्थिती गंभीर 
तेहरान:इराणमध्ये कारोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली असून गेल्या चोवीस तासात ३ हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. इराणचे आरोग्यमंत्री सईद नमाकी म्हणाले की, नागरिकांना देशातून कोरोना हद्दपार झाल्याचे वाटत आहेत. तर काही अधिकारी देखील स्थिती सामान्य झाल्याचा दावा करत आहेत. परंतु कोरोना संसर्ग आपल्यापासून दूर नसून तो कोणत्याही स्वरुपात उग्र रुप धारण करु शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. इराण सरकारच्या मते, कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांवर पोचली असून गेल्या चोवीस तासात २५१६ नवीन रुग्ण सापडले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT