Brazil Flood 2024 Esakal
ग्लोबल

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Brazil Flood Deaths: 67,000 हून अधिक लोक प्रभावित झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि 4,500 हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत.

आशुतोष मसगौंडे

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल या राज्यात त्याचा सर्वाधिक कहर होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत.

ब्राझीलमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हजारो लोक बेपत्ता आहेत. बचाव पथक बचाव कार्यात गुंतले आहे. नुकतेच आलेल्या आकडेवारीनुसार विनाशकारी पुरामुळे 281 नगरपालिका प्रभावित झाल्या आहेत आणि किमान 74 लोक जखमी झाले आहेत. (Brazil Flood 2024)

67,000 हून अधिक लोक प्रभावित झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि 4,500 हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत.

काही भागात छतापर्यंत पाणी गेल्याचे चित्र दिसत आहे. बचाव पथके लोक आणि पाळीव प्राणी शोधण्यात व्यस्त आहेत. शनिवारी सकाळी, जोरदार पावसामुळे गुआइबा सरोवरातील पाण्याची पातळी पाच मीटरने वाढली, ज्यामुळे राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेला धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम नदीच्या बंधाऱ्यांवरही होत आहे. 1.4 दशलक्ष लोकसंख्येचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या पोर्टो अलेग्रेला पुराचा विशेष फटका बसला.

येथे, शहरातून वाहणारी गुआइबा नदी 5.04 मीटर किंवा 16.5 फूट इतकी प्रचंड पूर उंचीवर आहे, ती 4.76 मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे. जी 1941 च्या विनाशकारी पुरापासून रेकॉर्ड आहे.

पुरामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, घरापासून ते रस्त्यांपर्यंत सर्व काही पाण्याने भरलेले दिसत आहे.

शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर बोटी फिरत आहेत. बुडून घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यावर इकडे-तिकडे वाहनेही अडकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT