jack dorsey  
ग्लोबल

जुन्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याबद्दल ट्विटरच्या संस्थापकांची जाहीर माफी; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर ईलॉन मस्क अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मागील काही दिवसांत कंपनीच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असून, यामध्ये सर्वाधिक कर्मचारी भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. या कपातीनंतर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी दिलगिरी व्यक्त केली. jack dorsey news in Marathi

इलॉन मस्क यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर डोर्सी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ट्विटरमध्ये पूर्वी आणि आता काम करणारे लोक प्रचंड प्रतिभाशाली आहेत. ते प्रत्येक अडचणीतून मार्ग काढू शकतात. मग कितीही वाईट काळ असो.

डोर्सी पुढं म्हणाले की, मला ठावूक आहे, की अनेक लोक माझ्यावर नाराज आहेत. माझ्यामुळेच ही स्थिती आली आहे. शिवाय मी कंपनीला कमी वेळेत मोठा विस्तार केला आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो, असंही डोर्सी यांनी म्हटलं.

ट्विटरने शुक्रवारी आपल्या ७,५०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. तातडीच्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. जगभरातील तज्ज्ञांना जेव्हा त्यांच्या कंपन्यांनी कामावरून काढलं होते, तेव्हा त्या लोकांना ट्विटरवर आपली खंत बोलून दाखवली होती. मात्र आता ट्विटरचे कर्मचाऱ्यांवरच ही वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT