Condoms Free for Young People in France esakal
ग्लोबल

Free Condom : नवीन वर्षात 25 वर्षांखालील लोकांना मिळणार मोफत कंडोम; 'या' देशाच्या राष्ट्रपतींचा महत्वपूर्ण निर्णय

'अनेक अल्पवयीन मुलांनी लैंगिक संबंध ठेवले आहेत, त्यांनाही स्वतःचं संरक्षण करण्याची गरज आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'अनेक अल्पवयीन मुलांनी लैंगिक संबंध ठेवले आहेत, त्यांनाही स्वतःचं संरक्षण करण्याची गरज आहे.'

पॅरिस : नवीन वर्षात फ्रान्समध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लवकरच मोफत कंडोम (Condoms Free) उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासंदर्भात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) यांनी घोषणा केलीय.

तरुणांमध्ये लैंगिक आजार वाढत आहेत. या वर्षीच्या महागाईमुळं फ्रान्समधील गरीब लोकांची अवस्था बिकट झालीय. अवांछित गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोगांचा (एसटीडी) प्रसार कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. मॅक्रॉन पश्चिम फ्रान्समधील पॉईटियर्सचे उपनगर फॉन्टेन-ले-कॉम्टे इथं तरुणांसोबत आरोग्य चर्चेदरम्यान बोलत होते.

18 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करणारी एक योजना विस्तारित करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये कंडोमची प्रतिपूर्ती राष्ट्रीय आरोग्य सेवा प्रणालीद्वारे केली जाते. हे सर्व लैंगिक शिक्षणावर आधारित आहे. आपल्या देशात यासंदर्भात यावर बोललं जात नाही. परंतु, हे असं क्षेत्र आहे जिथं आपल्याला शिक्षकांना अधिक चांगलं शिक्षण देण्याची गरज आहे. गर्भनिरोधकांसाठी ही एक छोटी क्रांती आहे, असं मॅक्रॉन म्हणाले.

मॅक्रॉन यांची 2017 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी पहिल्यांदा अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा ते फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी एचआयव्ही आणि इतर लैंगिक संक्रमित विषाणू रोखण्यासाठी उपाययोजना वाढविण्याचं आश्वासन दिलं होतं. मॅक्रॉन यांनी या परिषदेत फेस मास्क घातला होता. ते आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करीत आहेत. कारण, सरकारनं सुट्टीच्या आधी कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. अद्याप फ्रान्समध्ये मास्क संदर्भात कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT