Freedom Convoy In Canada esakal
ग्लोबल

कॅनडातील आंदोलन करणारे ट्रकचालक आक्रमक, पंतप्रधानांचा मागितला राजीनामा

आंदोलन कॅनडासह अमेरिका, न्यूझीलंड आणि फ्रान्समध्येही सुरु झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

ओटावा : कॅनडाची राजधानी ओटावात ५० हजार ट्रकचालक आंदोलनकर्त्यांनी पण केला, की पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरुच राहील. ते म्हणाले ट्रुडो यांना पायउतार व्हावेच लागेल. यापूर्वी पंतप्रधान ट्रुडो आंदोलनकर्त्यांना मुठभर घोषणा देणारे आणि झेंडा फडकवणारे असे म्हटले होते. त्यांनी देशाच्या संसदेत सुरु असलेल्या चर्चेत हे वादग्रस्त विधान केले होते. यामुळे विरोधी पक्षांसह त्यांच्या लिबरल पक्षाचे खासदारही भडकले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करु लागले. आता आंदोलनकर्त्यांनी 'डेली मेल'शी बोलताना म्हटले, की ट्रुडो यांचे विधान निरर्थक आहे. त्यांनी पण केला आहे, की ओटावा शहरात आंदोलन (Freedom Convoy 2022) ट्रुडो यांच्या राजीनामा आणि मास्क आणि कोरोना लसीची सक्ती मागे घेतल्याशिवाय आंदोलन सुरुच राहिल. (Freedom Convoy Continue Still Canadian PM Justin Trudeau Resignation Said Truck Drivers)

कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवरील व्यापार ठप्प

आंदोलनकर्ता जेरी इगल्स म्हणाले, मला म्हणायचे आहे की ट्रुडो आता कॅनडाच्या(Canada) लोकांच्या संपर्काबाहेर गेले आहेत. त्यांना आमचे नेते असल्याचा हक्क नाही. दुसरा आंदोलनकर्ता म्हणाला, ट्रुडो खोटारडे आहेत आणि ते आईस्क्रिम विकण्यासही योग्य नाहीत.जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पियरे ट्रुडो यांचे पुत्र आहेत. या दरम्यान ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवरील व्यापार ठप्प झाला आहे. यावर दोन्ही देशांतील प्रशासनाचा विचार आहे की सदरील आंदोलन मोडून काढावे. मिशिगनचे गव्हर्नर ग्रेटचेन व्हिटमर म्हणाले, की माझा निरोप स्पष्ट आहे. रस्त्यावरील ट्राफिक पुन्हा आणली जावी.

दुसरीकडे कॅनडातील ट्रकचालकांचे आंदोलन जगातील दुसऱ्या भागातही पसरले आहे. हे सर्व कोरोना लस घेण्याच्या सक्तीविरोधात आंदोलन करित आहेत. हे आंदोलन कॅनडासह अमेरिका, न्यूझिलंड आणि फ्रान्समध्येही सुरु झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT