friends playing football for the last time for their dead friend video viral 
ग्लोबल

डोळ्यात पाणी आणणारा मैत्रिचा व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

मेक्सिको (अमेरिका): सोशल मीडियावर एक मैत्रिचा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केवळ 54 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. पण, लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून, 13 हजारपेक्षा जास्त वेळा  रिट्वीट केला आहे.

Noticias de Oaxaca ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. शिवाय, डोळ्यांमध्ये अश्रू आणणारे शीर्षक दिले आहे. या व्हिडिओमध्ये जमिनीवर एक शवपेटी ठेवली आहे. या शवपेटीवर Alexander lo despiden असे नाव असून, त्यामध्ये अलेक्झँडरचा मृतदेह आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडिओ मेक्सिकोमधील आहे. या 16 वर्षीय मुलाची हत्या झाली असून, मृत्यूनंतर त्याचे शव त्याठिकाणी नेण्यात आले जिथे तो फुटबॉल खेळत असायचा. मृतदेह मैदानावर नेल्यानंतर त्याच्या मित्रांनी गोल केला. गोल झाल्यानंतर त्याचे सर्व मित्र त्या शवपेटीला बिलगतात. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी येते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले. व्हिडिओमधून मित्रावरील प्रेम दिसून येते.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडिओ व्हायरल करत असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातूनही व्यक्त होताना दिसतात. शिवाय, मैत्री कशी असावी, याचे उदाहरण देताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT