ग्लोबल

Israel Attack Gaza: गाझाच्या नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; दक्षिणेत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी 'पाथ टू सेफ्टी' जारी

कार्तिक पुजारी

तेल अविव- इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे. लष्कराने गाझाच्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. नागरिकांना एक रस्ता दिला असून गाझाच्या उत्तर भागातून दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्राइल लष्कर गाझा पट्टीचा उत्तर भाग पूर्णपणे ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

इस्राइली डिफेन्स फोर्सने यासंदर्भातील एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'गाझामध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कोणतेही ऑपरेशन लाँच केले जाणार नाही. या काळात नागरिकांनी दक्षिणेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे'. या वेळेनंतर इस्राइली लष्कर तीव्र कारवाईला सुरुवात करणार आहे.

इस्राइलकडून 'पाथ टू सेफ्टी' जारी करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान गाझाच्या नागरिकांनी यावेळेत या मार्गावरुन दक्षिण भागात सुरक्षित जावे. त्यांना कोणतीही हानी पोहोचवली जाणार नाही. याकाळात कोणतेही ऑपरेशन राबवले जाणार नाही. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं इस्राइली लष्कराने म्हटलं आहे.

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे आमच्या सूचना पाळा आणि दक्षिणीकडे जा. हमासच्या नेत्यांनी याआधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, असं इस्राइलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इस्राइल गाझाच्या उत्तर भागात जमिनी कारवाई करणार आहे.

इस्राइलच्या लष्कराने गाझाच्या नागरिकांना याआधी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. याकाळात नागरिकांना गाझाचा दक्षिण भाग रिकामा करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. लाखो लोक उत्तर भागात राहतात. त्यामुळे इतक्या कमी वेळात त्यांचे स्थलांतर अवघड होते. आता इस्राइली लष्कराने शेवटचा इशारा दिला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT