GDP 
ग्लोबल

GDP: चीनची पिछाडी, भारताची आघाडी ; ‘जीडीपी’ सात टक्के होण्याचा ‘एस अँड पी’चा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

GDP: भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग २०२६ पर्यंत सात टक्क्यांपर्यंत वाढेल, तर चीनच्या वाढीचा वेग ४.६ टक्के असेल, असा अंदाज ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. ‘चायना स्लोज इंडिया ग्रोज’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आशिया-प्रशांत क्षेत्राच्या वाढीला चालना देणारे केंद्र आता चीनमधून दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये स्थलांतरित होण्याची अपेक्षाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. चीनचा ‘जीडीपी’ २०२४ मध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत, तर २०२५ मध्ये ४.८ टक्क्यांपर्यंत आणि २०२६ मध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे,

तर चालू आर्थिक वर्षात भारताचा ‘जीडीपी’ ६.४ टक्क्यांपर्यंत, २०२५ साठी ६.९ टक्के, त्यानंतर २०२६ मध्ये सात टक्क्यांपर्यंत वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे.

या क्षेत्रातील महत्त्वाची अर्थव्यवस्था असलेल्या व्हिएतनामचा ‘जीडीपी’ ६.८ टक्के आणि इंडोनेशियाचा विकासदर पाच टक्क्यांवर स्थिर असेल, असेही ‘एस अँड पी ग्लोबल’ने या अहवालात नमूद केले आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर उच्च ठेवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या भागातील कर्जे महागतील. त्याच वेळी, पश्चिम आशियातील भू-राजकीय संघर्षाचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होईल, त्यामुळे ऊर्जा खर्च, महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे मागणी कमी होण्याचाही धोका आहे.

मंदावलेल्या जागतिक मागणीचाही आशिया-प्रशांत क्षेत्राच्या वाढीवर परिणाम जाणवेल, असेही ‘एस अँड पी’ने म्हटले आहे. या क्षेत्राच्या वाढीचा दर २०२४ साठी ४.४ टक्क्यांवरून ४.२ टक्क्यांवर आणला असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT