george floyd killing he was arrested for using fake currency 
ग्लोबल

अमेरिकेत बनावट नोटांमुळे जाळपोळ आणि आंदोलनाचा भडका

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंगटन, 02 जून : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अनेक शहरांमध्ये जाळपोळ, हिंसाचार सुरू झाला आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसी आणि व्हाइट हाउस पर्यंत आंदोलन पोहोचले आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प म्हणाले की, जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला पूर्णपणे न्याय देण्यात येईल. देशाचे आणि इथल्या नागरिकांचे रक्षण करण्याला माझे प्राधान्य राहील. जॉर्ज फ्लॉइडच्या निर्दयी हत्येमुळे सर्व अमेरिकन दु:खी आहे. त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यात कोणतीही कसूर सोडणार नाही. माझे प्रशासन त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असेही ट्रम्प यांनी सांगितले. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की,'मी तुमचा राष्ट्रपती आहे. देशाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची शपथ घेतली होती आणि मी ते कर्तव्य पार पाडेन.' अमेरिकेत जॉर्जच्या मृत्यूनंतर आंदोलन करणाऱ्या 4 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे.

अमेरिकेतील राज्यांना ट्रम्प यांनी नागरिकांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. जर एखाद्या राज्याने नागरिकांचे आणि संपत्तीचे रक्षण करण्यास नकार दिला तर त्या ठिकाणी अमेरिकन लष्कर पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

हिंसाचारात निरागस लोकांचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा बळी जात आहे. राष्ट्राध्यक्ष या नात्यानं मी नागरिकांचे संरक्षण करेन असंही ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत सुरु असलेल्या या आंदोलन, हिंसाचारामागे जॉर्जची हत्या आहे. वर्णद्वेषातून ही हत्या झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान जॉर्जला पोलिसांनी बनावट नोटेचा वापर केल्याबद्दल अटक केली होती. गेल्या आठवडयात 25 मे रोजी 20 डॉलरच्या बनावट नोटेचा वापर केल्या प्रकरणी अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा डेरेक शॉविन नावाच्या पोलिसाने जॉर्जच्या गळ्यावर निर्दयीपणे गुडघा दाबल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जॉर्जच्या मृत्यूनंतर हे प्रकरण वर्णभेदी असल्याचा आरोप करत कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमेरिकेत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिसांचार, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे व्हाइट हाउससुद्धा बंद करावं लागलं आहे.

पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT