Germany esakal
ग्लोबल

लसीकरणाचं बनावट सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीनं पत्नीसह 3 मुलींची हत्या

सकाळ डिजिटल टीम

घटनास्थळावरून पोलिसांना एक लांब पानाची चिठ्ठीही सापडलीय.

बर्लिन : जर्मनीत (Germany) बनावट कोविड-19 लसीचं प्रमाणपत्र (Fake Covid Vaccine Certificate) लीक होण्याच्या भीतीनं एका व्यक्तीनं आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केलीय. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीनं आपल्या पत्नीचं बनावट लसीकरण प्रमाणपत्र बनवलं होतं. हे प्रकरण उघडकीस आल्यावर, कुटुंबाला वेगळं केलं जाईल, अशी भीती त्यांना होती.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना बर्लिनच्या (Berlin) दक्षिणेकडील कोनिग्स वुस्टरहॉसेनमधील (Königs Wusterhausen) आहे. पोलिसांना (Police) शनिवारी शेजाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर घरातून पती-पत्नी (दोघांचं वय 40) आणि तीन मुलींचा मृतदेह पोलिसांना सापडला. मुलींचं वय 10, 8 आणि 3 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. घटनास्थळावरून पोलिसांना एक लांब पानाची चिठ्ठीही सापडलीय. यामध्ये डेव्हिड आर नावाच्या व्यक्तीनं लिहिलंय, मी माझी पत्नी लिंडासाठी बनावट लसीकरण प्रमाणपत्र बनवलं होतं, असं नमूद आहे.

फिर्यादी गर्नोट बॅंटलोन यांनी डीपीए या वृत्तसंस्थेला सांगितलं की, या जोडप्याला अटक केली जाईल आणि त्यांच्या मुली लेनी, जेनी आणि रुबी यांना त्यांच्यापासून दूर केलं जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीमध्ये एक नवीन कायदा करण्यात आलाय. या अंतर्गत कोविड लसीचं बनावट प्रमाणपत्र बनवणं गुन्हा असून असं आढल्यास एक वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे. या व्यक्तीनं आधी पत्नी आणि मुलींवर गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडल्याचा संशय तपासकर्त्यांना आहे. पोलिसांना घरातून एक बंदूकही सापडलीय. मात्र, या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT