बर्लिन: कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जर्मनीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील बैठकीनंतर पत्रकार परिषदेसाठी जाताना चॅन्सलर अंजेला मर्केल आदी. 
ग्लोबल

जर्मनीत लॉकडाउन वाढवला; अंजेला मर्केल यांची घोषणा

पीटीआय

बर्लिन - जर्मनीत कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाउनचा कालावधी १८ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी देशाची स्थिती चांगली नसल्याचे म्हटले आहे. कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

जर्मनीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ईस्टरच्या सुट्यादरम्यान नागरिकांनी पाच दिवस घरातच राहवे, असे आवाहन अंजेला मर्केल यांनी केले आहे. जर्मनीतील सर्व १६ राज्यातील नेत्यांना कोरोनाविरोधात मोहीम राबवताना कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पुन्हा अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्याबद्धल चिंता व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जागतिक आरोग्य संघटनेच्या वॅन करखोवे यांनी म्हटले की, गेल्या सहा आठवड्यापासून मृतांचा आकडा कमी राहत होता, मात्र गेल्या आठवड्यात त्यात वाढ दिसून आली. नवीन रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या देखील वाढत चालली असून ही बाब चिंताजनक आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये अनावश्‍यक परदेश प्रवासावर बंदी घालण्याची तयारी केली जात आहे. हा नियम येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. हा नियम जूनपर्यंत राहू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याचे पालन न केल्यास सुमारे पाच लाख रुपयांचा दंड देखील आकारला जावू शकतो, असे सरकारी सूत्राने सांगितले.

जगभरात साडेबारा कोटी रुग्ण
जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासात सुमारे चार लाखाहून अधिक लोकांना बाधा झाली असून ७ हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत १२.३८ कोटीहून अधिक लोकांना बाधा झाली आहे. त्यापैकी दहा कोटीहून अधिक नागरिक बरे झाले आहेत तर २७.३५ लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या दोन कोटीहून अधिक नागरिक रुग्णालयात आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT