vaccination File photo
ग्लोबल

भन्नाट ऑफर! कोरोनाची लस घ्या अन् मिळवा घर

नागरिकांनी लस घ्यावी यासाठी भन्नाट आयडिया

शर्वरी जोशी

कोरोना (corona) विषाणूवर अद्याप कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर लसीकरण (vaccine) करणं सध्याच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. यामध्येच जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. यामध्येच हॉगकॉगमध्ये (hong-kong) नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा यासाठी प्रशासनाने भन्नाट ऑफर दिली आहे. (get-corona-vaccine-and-win-10-million-house-unique-offer-in-hong-kong)

जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी हॉगकॉगमध्ये घरासाठी लकी ड्रॉ कूपनची ऑफर देण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमधून एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यात भाग्यवान विजेत्याला १४ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १० कोटी रुपयांचं घर मिळणार आहे. ही ऑफर हॉगकॉगच्या डेव्हलपर्सद्वारे देण्यात येत आहे.

हॉगकॉगमधील नागरिक लसीकरणासाठी फारसे उत्सुक नसल्यामुळे ही ऑफर देण्यात आली आहे. सिनो ग्रुपच्या एनजी टेंक फोंग चॅरिटेबल फाऊंडेशनसोबत चीनच्या इस्टेट होल्डिंग लिमिटेडने ही ऑफर सुरु केली आहे. क्वान टोंग भागात सिनो ग्रुपचा नवा ग्रॅड सेंट्रल प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. या प्रोजेक्टमध्ये नागरिकांना घर देण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनावरील लसींची एक्सपायरी डेट संपत आली आहे. मात्र, तरीदेखील नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत नाहीयेत. म्हणूनच, ही ऑफर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हॉगकॉगमध्ये केवळ १२.६ टक्के नागरिकांनीच लस घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

Latest Marathi News Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

SCROLL FOR NEXT