लसीकरण 
ग्लोबल

"कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त लसीकरण हाच उपाय"

नामदेव कुंभार

covid-19 vaccine : देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे देशातील परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. पाच दिवसांपासून देशात चार लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. अमेरिका येथील जो बायडन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची (anthony fauci) यांनी भारतातील कोरोना (covid-19) संकटावर उपाय सांगितला आहे. रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना फाऊची यांनी लसीकरण (vaccine) हा भारतातील कोरोना (covid-19) संकट टाळण्यासाठी एकमेव उपाय असल्याचं सांगितलं.

भारतात सध्या सुरु असलेल्या कोरोना (covid-19) संकटावर लसीकरण (vaccine) हा एकमेव दीर्घकालीन उपाय आहे. तसेच जगभरात कोरोना लसीचं उत्पादन वाढवायला हवं, असेही फाऊची (anthony fauci) म्हणाले. कोरोना महामारीला मुळापाशून संपवण्यासाठी सर्वांचं लसीकरण करणं हा एकमेव उपाय आहे. भारत जगातील सर्वात मोठा लस (vaccine) निर्मिती करणारा देश आहे. फक्त भारतातूनच नव्हे तर विदेशातूनही उत्पादनाला लागणारे घटक मिळत आहे. अन्य देशांनीही भारताला लस निर्मितीसाठी मदत करायला हवी, असे फाऊची म्हणाले.

एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना फाऊची म्हणाले की, 'ज्या पद्धतीनं चीननं वर्षभरापूर्वी मोठमोठी रुग्णालये तयार केली. तशीच रुग्णालये भारतानेही करायला हवीत. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तुम्ही रस्त्यावर नाही सोडू शकत.' पुढे बोलताना फाऊची (anthony fauci) म्हणाले की, भारतातील ऑक्सिजनची परिस्थितीही खूप भयावह आहे. लोकांना ऑक्सिजन न मिळणं खरेच दु:खद आहे.

कोरोना (covid-19) महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनची (Lockdown) गरज असल्याचेही फाऊची म्हणाले. तसेच कडक लॉकडाउनच्या दरम्यान लसीकरणावर भर दिल्यास कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येईल, असे फाऊची (anthony fauci) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT