Glass bridge 
ग्लोबल

वाऱ्यामुळे तुटला Glass bridge; ३३० फुटांवर लटकला पर्यटक

थरकाप उडवणारा फोटो व्हायरल

शर्वरी जोशी

जोरदार वादळी वाऱ्यामुळे (heavy wind) चीनच्या (China) प्रसिद्ध ग्लास ब्रीजला (Glass bridge) धक्का पोहोचला आहे. ९० किलोमीटर प्रतितास वेगाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या पुलाचं नुकसान झालं असून या ब्रीजवरील (bridge) काही काचा उडाल्या आहेत. इतकंच नाही तर यावेळी पुलावरुन चालणारा एक पर्यटक (tourist) ३३० फूट उंचीवर अडकला होता. मात्र, सुदैवाने येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवले आहे. या घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (glass bridge in china shatters after heavy wind leaving tourist trapped partway across)

'Daily Mail'च्या वृत्तानुसार, ही घटना चीनच्या लोंगजिंग (Longjing City) शहरात घडली आहे. लोंगजिंग येथे ३३० फूट उंचीवर काचेचा ब्रीज बांधण्यात आला असून शुक्रवारी येथे मोठं वादळ-वारं आलं. वेगाने आलेल्या या वादळामुळे ब्रीजवरील काही काचा उडून गेल्या आणि परिणामी, ब्रीजवर असलेला एक पर्यटक पुलावर अडकला. विशेष म्हणेज अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या पर्यटकाने ब्रीजच्या रोलिंगला पकडून ठेवलं. त्यानंतर अग्निशमन दल, पोलिस आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पर्यटकाची सुखरूप सुटका केली.

घडलेल्या प्रकारामुळे या पर्यटकाला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेत त्याचं मानसोपचार तज्ज्ञांनी समुपदेशन केल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT