burgers 
ग्लोबल

फुकटात बर्गर न दिल्यामुळे पोलिसांनी घेतलं हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात

या कर्मचाऱ्यांना तब्बल ७ तास ताब्यात ठेवलं होतं.

शर्वरी जोशी

तुम्ही जे काही खाल ते स्वत: च्या क।ष्टाच्या पैशात खा असा सल्ला कायमच वडीलधारी मंडळी देत असतात. यात काही जण मनापासून या आज्ञेचं पालन करतात. तर, काही जण त्याकडे दुर्लक्ष करुन फुकटात मौज करणं किंवा एखाद्याकडून लाच घेण्याचे प्रकार करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक पाकिस्तानी पोलिसांचा अजब प्रकार चर्चेत आला आहे. फुकटात बर्गर (burgers) देण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानी पोलिसांनी चक्क हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. (global pakistani-police-detainde-hotel-staff-for-not-providing-free-burgers)

लाहोरमधील जॉनी अॅण्ड जुग्नून या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून हॉटेलमध्ये आलेल्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे फुकटात बर्गर मागितला. मात्र, कर्मचाऱ्यांनी पैशांशिवाय बर्गर मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील तब्बल १९ जणांना ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर या कर्मचाऱ्यांना तब्बल ७ तास ताब्यात ठेवलं होतं. मात्र, हा प्रकार पाकिस्तानी पोलिस प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित ९ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. याविषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी इनाम घानी यांनी ट्विट करुन माहितीदेखील दिली आहे.

"कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही", असं ट्विट इनाम घानी यांनी केलं. दरम्यान, पाकिस्तानी पोलिसांबाबत घडलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीदेखील असे अनेक प्रकार इथे घडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT