Facebook e sakal
ग्लोबल

Facebook पोस्टमधील व्याकरणाची चूक पडली महाग, प्रकरण थेट कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा लिहिताना व्याकरण्याच्या चुका होतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. व्याकरणाची एक चूक किती महागात पडू शकते? याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. फेसबुकवर (Facebook) पोस्ट लिहिताना व्याकरणाची एक चूक झाली. त्यामुळे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया येथील न्यू साऊथ वेल्स येथील रहिवासी एंथनी जैड्रेविक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिताना एक चूक केली होती. त्यांच्याकडून एपॉस्ट्रॉफी S सुटला होता. ही एक खूपच नगण्य चूक होती. मात्र, ही पोस्ट ज्या व्यक्तीबद्दल होती, ते व्याकरणाचे नियम काटेकोरपणे पाळत होते. त्यामुळे त्यांनी पोस्टकर्ते एंथनी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला. एंथनी यांनी ही केस जिंकली नाहीतर त्यांनी पैसे मोजून द्यावे लागणार आहेत.

एंथनीने ऑक्टोबर २०२० मध्ये फेसबुकवर ही पोस्ट केली होती. यामधून त्यांनी त्यांच्याच कंपनीतील एका कर्मचाऱ्यावर आरोप केले होते. इतके पैसे कमावून देखील ते कर्मचाऱ्यांना आवश्यक पगार देत नाहीत, असा हा आरोप होता. या पोस्टमध्ये एंथनीने चुकीने Employee’s ऐवजी Employees लिहिले होते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. आता याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी घेत म्हटले की, सर्व कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे ही जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. ''सर्वच कर्मचाऱ्यांबाबत मी बोललो नाही. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण इथंच थांबवावे'', अशी विनंती एंथनीने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. याप्रकरणी एंथनी जर दोषी आढळले, तर त्यांना मानहानीचे पैसे भरून द्यावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT