greta
greta 
ग्लोबल

ग्रेटा Exposed! जागतिक पातळीवरील समर्थनासाठीचे डॉक्यूमेंट्स ट्विट करुन पुन्हा डिलीट

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉपस्टार रिहाना आणि मिया खलिफा यांनी भारतात सुरु असणाऱ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनावरील घेतलेल्या भुमिकेमुळे चर्चेत आल्या आहे. गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ऐन कडाक्याच्या थंडीत अनेक अडचणींना सामोरे जात आंदोलन करत आहेत. गेल्या 70 दिवसांत जराही ब्र न काढणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींनी आता या आंदोलनाच्या संदर्भात भुमिका घ्यायला सुरवात केली आहे. जागतिक पातळीवरुन उठलेल्या आवाजांना 'हा आमचा अंतर्गत मामला आहे' अशा आशयाचे उत्तर देणारे ट्विट्स भारतीय सेलिब्रिटींनी केल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्यूमेंट्स ग्रेटाने ट्विटरवर शेअर केले होते. ते आता डिलीट करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 

त्यांनी ग्रेटाने शेअर केलेल्या या स्ट्राईक टूल किटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या डॉक्यूमेंट्समध्ये लिहलंय की, ते 26 जानेवारी रोजी दंगल घडवण्याची तयारी आधीपासूनच करत होते, असा आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे.  

या डॉक्यूमेंटचे टायटल 'ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक- फर्स्ट वेव्ह' असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा. तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. 26 जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात / राज्यात / देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि मोठ्या अथवा लहान संख्येने सहभागी व्हा किंवा स्वत: एखादे आयोजन करा, असं या डॉक्यूमेंट्समध्ये म्हटलं आहे. 

ग्रेटाने शेअर केलेल्या डॉक्यूमेंट्समध्ये तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला फॅसिस्ट सत्ताधारी पक्ष असं म्हटलं आहे. आस्क इंडिया व्हाय अशा शीर्षकाखाली हे डॉक्यूमेंट आहे. यामध्ये शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवरुन समर्थन देण्यासाठीचे नियोजन आहे. लोकांना भारतीय दूतावास, स्थानिक सरकारी कार्यालये किंवा अदानी आणि अंबानी यांच्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयाजवळ एकत्रितपणे निषेध आयोजित करण्याबाबतचे उल्लेख आहेत.

आपण 26 तारखेवर लक्ष केंद्रित करत आहोत. शक्य तितक्या लवकर निषेध करणारी आंदोलने आयोजित करा. कारण हे प्रकरण लगेचच संपेल असे दिसत नाही,” असे या डॉक्यूमेंटमध्ये म्हटले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT