health ministry, India, coronavirus in uk
health ministry, India, coronavirus in uk 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूची धास्ती; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलवली बैठक

सकाळ ऑनलाईन टीम

Health Ministry Calls Urgent Meeting Of Joint Monitoring Group : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा स्ट्रेन आढळला असून यामुळे कोरोगाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. सातासमुद्रापलिकडून आलेल्या या बातमीनंतर भारताची चिंताही वाढली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  (Health Ministry) याच पार्श्वभूमीवर तात्काळ बैठक बोलावली आहे.  ज्वाइंट मॉनिटरिंग ग्रुप (Joint Monitoring Group) सोबतच्या बैठकीत नव्या संकटाच्या चाहूलीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने एकच  खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकारामुळे त्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे मानले जात आहे. ब्रिटन सरकारने कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणाबाहेरील असल्याचा इशारा दिला असून सरकारच्या या घोषणेनंतर युरोपियन युनियनमधील अनेक देशात ब्रिटनमधून होणारी विमान वाहतूक रद्द करण्यात आली आहे. ब्रिटनमध्येही पुन्हा कडक लॉकडाऊनचा निर्बंध लादण्यात आले आहेत.  

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणू आढळल्यानंतर खबरदारीच्या पार्श्वभूमीवर योग्य पावले उचलण्याचे दृष्टिने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावलेली बैठक महत्त्वपूर्ण आहे.  केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) विभागाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ज्वाइंट मॉनिटरिंग ग्रुपसोबतच्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे भारतीय प्रतिनिधीही उपस्थितीत राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर  (Coronavirus Strain) नव्या संकटाची भीती निर्माण झाली आहे. नव्या धोक्याची चाहूल लागताच ब्रिटन, जर्मन, आणि दक्षिण आफ्रिका हे देश हवाई वाहतूक पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. बेल्झियम आणि नँदरलँडने ब्रिटनहून होणारी विमान आणि रेल्वे वाहतूक थांबवली देखील आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT