Japan Rain eSakal
ग्लोबल

Japan Rain : जपानमध्ये पावसाचं थैमान! ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन, २० नद्यांना महापूर

इजुमो शहरात अतिवृष्टीमुळे सुमारे १५ ठिकाणी भूस्खलन झाल्याचे दिसून आले.

Sudesh

जपान देश सतत मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतो. कधी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ आपत्ती येणाऱ्या या देशामध्ये आता पावसाने थैमान घातलं आहे. शनिवारी जपानमधील शिमाने प्रांत आणि देशाच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अवघ्या सहा तासांमध्ये शिमाने आणि इजुमो भागात १०९ मिमी पावसाची नोंद झाली. तर, शेजारीच असणाऱ्या मात्सु प्रांतात ९५.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तेथील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

२० नद्यांना महापूर

जपानमधील इजुमो शहरात अतिवृष्टीमुळे सुमारे १५ ठिकाणी भूस्खलन झाल्याचे दिसून आले. तर, या भागातील तब्बल २० नद्यांना महापूर आल्याची माहिती प्रशासनाने दिली. रविवारी देखील अशाच प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

लोकांना घर सोडण्याचे आदेश

स्थानिक प्रशासनाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इजुमो आणि शिमाने प्रांतातील सुमारे ३.७० लाख नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन केले आहे. घरातून बाहेर पडून, सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात (३ जुलै) देखील कुसुमोटो शहरातील ३.६० लाख नागरिकांना अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रकची पोलिसांच्या गाडीला धडक, ५ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Suryakumar Yadav: भारतीय संघाच्या तयारीवर सूर्यकुमार यादवचा विश्वास; अभिषेक शर्माच्या फटाक्याची तयारी

Latest Marathi News Live Update : राजापूर किनाऱ्यावर स्फोटासारख्या आवाजांमुळे खळबळ; टगबोटीवरील सिग्नल पिस्टल फायरिंगचा प्रकार उघड

पुणे–सातारा महामार्गावर २४ तासांत दुसरा अपघात; आधी ट्रक उलटला, आता टेम्पो अन् ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक, कोल्हापुरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन, VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT