Shri Mari Mata Temple esakal
ग्लोबल

पाकिस्तानात मंदिराच्या पुजाऱ्यावर भ्याड हल्ला; जमावाकडून मूर्तींची तोडफोड

सकाळ डिजिटल टीम

कराची शहरातील हिंदू मंदिरात देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आलीय.

कराची : पाकिस्तानमधील (Pakistan) कराची (Karachi) शहरातील एका हिंदू मंदिरात (Hindu Temple) देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आलीय. पोलिसांनी ही माहिती दिलीय. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांमध्ये तोडफोडीचं हे ताजं प्रकरण आहे.

पोलिसांनी सांगितलं की, बुधवारी कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात (Shri Mari Mata Temple) देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. कोरंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘जे’ परिसरात हे मंदिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मंदिराची पाहणी करून या प्रकरणाची चौकशी केली.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळं हिंदू समाजातील (Hindu Community) लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषत: कोरंगी भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात राहणारे हिंदू संजीव यांनी वृत्तपत्राला सांगितलं की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. हा हल्ला कोणी केला आणि का केला हे आम्हाला माहीत नाही, असं ते म्हणाले.

कोरंगीचे एसएचओ फारुख संजरानी म्हणाले, "पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराची तोडफोड करून पळ काढला." पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येच्या मंदिरांना अनेकदा जमावाकडून लक्ष्य करत आहेत. ऑक्टोबरमध्ये कोटरी येथील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका ऐतिहासिक मंदिराला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केलं होतं. याप्रकरणी कोटरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 7.5 दशलक्ष हिंदू राहतात. मात्र, समाजानुसार देशात 90 लाखांहून अधिक हिंदू आहेत. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे. ते अनेकदा अतिरेक्यांकडून छळ होत असल्याची तक्रार करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update: कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकांचा बीड दौरा

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT