ग्लोबल

DART Mission : नासाने रचला इतिहास; पृथ्वीचा विनाश करणाऱ्या लघुग्रहांवर 'मिशन डार्ट' यशस्वी

हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाने 'डार्ट मिशन' यशस्वीरित्या राबवले आहे. या डार्ट मिशन अंतर्गत नासाचे डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट उल्केवर आदळले आहे. नासाने अवकाशात फिरणाऱ्या डायमॅारफस लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता.

नासाने आज पहाटे ही मोहीम यशस्वी केली आहे. भारतीय वेळेनुसार, म्हणजेच आज (27 सप्टेंबर 2022 रोजी) पहाटे 4.45 वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॅारफस ॲस्ट्रॅायडसोबत टक्कर झाली. यामध्ये नासाचं अंतराळयान नष्ट झालं. पण ॲस्ट्रॅायडचा वेग आणि दिशा बदलण्यात नासाला यश आलं आहे.

नासाने अवकाशात फिरणाऱ्या डायमॅारफस लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता. अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूतही ठरु शकते. त्यामुळे नासाचे हे मिशन फार महत्त्वाचे होते आणि ते यशस्वी झाले आहे. डायमॅारफस नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर झाली आहे.

हे मिशन फत्ते करुन नासाने नवीन इतिहासच रचलाय. लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे नासाचं हे मिशन फार महत्त्वाचे होते. डार्ट अंतराळयानाला धडकलेल्या लघुग्रहाची लांबी ही 169 मीटर होती. या धडकेमुळे लघुग्रहाची दिशा आणि वेग बदल्यात मदत झाली असून त्यामुळे पृथ्वीवरील खुप मोठा धोका टळला आहे.

नासाला पृथ्वीच्या जवळ अंतराळ फिरणारे 8000 निअर अर्थ ऑब्जक्ट्स आढळलेत. हे ॲस्ट्रॅायड म्हणजे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT