Mango India google
ग्लोबल

Mango India : रस्त्यावर कपडे विकून उभा केला मँगो नावाचा इंटरनॅशनल ब्रँड

मँगो फॅशन ब्रँडचे मुख्यालय बार्सिलोना, स्पेन येथे आहे. इस्तंबूलमध्ये 1953 मध्ये जन्मलेले इसाक अँडीक हे या ब्रँडचे संस्थापक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जगात असे अनेक फॅशन ब्रँड आहेत, जे भारतीय बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. 1984 साली स्थापन झालेला, MANGO हा देखील असाच एक स्पॅनिश फॅशन ब्रँड आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च गुणवत्ता राखली आहे.

या वर्षाच्या अखेरीस, ही कंपनी MANGO INDIA या नावाने भारतीय बाजारपेठेतही आपला व्यवसाय वाढवणार आहे. (history of a mango international brand )

मँगो ही स्पॅनिश कपड्यांची कंपनी आहे. या ब्रँडने गेल्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याचे कपडे बोल्ड मानले जातात. त्यांची उत्पादने थोडी महाग आहेत परंतु स्टाईलसाठी ती खूप प्रसिद्ध आहेत. हा ब्रँड महिला आणि पुरुषांच्या प्रत्येक वयोगटात लोकप्रिय आहे.

कंपनी कधी आणि कशी सुरू झाली ?

मँगो फॅशन ब्रँडचे मुख्यालय बार्सिलोना, स्पेन येथे आहे. इस्तंबूलमध्ये 1953 मध्ये जन्मलेले इसाक अँडीक हे या ब्रँडचे संस्थापक आहेत. 1969 मध्ये त्यांचे कुटुंब तुर्किहून स्पेनला गेले. नव्या देशात आल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचे संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत त्यांनी भावासोबत कपड्याचा व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला त्यांनी टी-शर्ट आणि नंतर जीन्स विकली. जेव्हा दोन्ही प्रकारचे कपडे चांगले विकू लागले, तेव्हा त्यांनी 1984 मध्ये आपली कंपनी स्थापन केली आणि देशभरात आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली.

नव्वदच्या दशकात लोकप्रियता मिळवली

स्पॅनिश बाजारपेठेत यश मिळाल्यानंतर, इसाक अँडिक आणि त्याचा भाऊ नहमान अँडिक यांनी जगातील इतर काही देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात करण्यास सुरुवात केली. 1993 मध्ये, कंपनीने एकट्या स्पेनमध्ये 100 पेक्षा जास्त स्टोअर उघडले. यानंतर, 2002 मध्ये कंपनीचा विस्तार 70 देशांमध्ये झाला.

अलीकडच्या काळात मँगोने आशियाई देशांच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. भारताव्यतिरिक्त, कंपनीची उत्पादने पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

कंपनीचे व्यवस्थापक म्हणतात की त्यांच्या संस्थापकाचा एकच मंत्र आहे की ग्राहकांना आनंदी ठेवायचे असेल तर गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका. यामुळेच मँगो ची उत्पादनेही विश्वासार्ह आहेत.

जागतिक प्रसिद्ध फॅशन ब्रँड मँगो आता भारतातील मोठ्या शहरांमध्ये वेगाने पसरत आहे. मँगो इंडिया बॅनरची बेंगळुरूमध्ये एकूण 35 नवीन दुकाने उघडण्याची योजना आहे. या क्रमाने लुधियानामध्ये दोन नवीन फ्लॅगशिप स्टोअर्सचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कंपनी भारतातील विविध शहरांमध्ये 110 हून अधिक स्टोअर उघडणार आहे.

भारतातील विस्तार योजनांबद्दल, मँगोचे संचालक डॅनियल लोपेझ म्हणतात की भारत आमच्या व्यवसाय धोरणासाठी योग्य भागीदार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT