howdy modi event at Houston america by modi and trump on 22 September 
ग्लोबल

#HowdyModi अमेरिकेत मोदी-ट्रम्प एकत्र भाषण करणार!

वृत्तसंस्था

ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. या आठवड्यात ते अमेरिका दौऱ्यावर असून टेक्सास मधील ह्युस्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार असून मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्रितपणे 50 हजार लोकांना संबोधित करणार आहेत. 

मोदींच्या ह्युस्टनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला #HowdyModi असे संबोधण्यात येत असून, हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन संसदेतील 50 हून अधिक खासदार आणि गव्हर्नर मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मेडिसन स्क्वेअर आणि सिलिकॉन व्हॉली येथील कार्यक्रमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील हा तिसरा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सहभागी होणार असल्याने हाऊडी मोदी हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरणार आहे. तसेच अमेरिकेतील रस्त्यांवर आतापासूनच मोदींचे पोस्टर्स झळकत आहेत.   

ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT