Thai politician Prapaporn Choeiwadkoh Esakal
ग्लोबल

थायलंडच्या प्रसिद्ध राजकारणी महिलेचे २४ वर्षीय दत्तक भिक्खुसोबत संबंध; पतीने व्हिडिओ केले व्हायरल

Thai Politician Caught By Husband Having An Affair With 24-year-old Adopted Son: थायलंडच्या एका राजकारणी महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

कार्तिक पुजारी

Bangkok- थायलंडच्या एका राजकारणी महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. राजकीय नेत्या प्रापपोर्न चोइवाडकोह (Prapaporn Choeiwadkoh) यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आलं आहे. प्रापपोर्न आणि त्यांच्या पतीने एक वर्षांपूर्वी साधू असलेल्या एका २४ वर्षीय मुलाला दत्तक घेतले होते. याच मुलासोबत प्रापपोर्न यांचे लैंगिक संबंध असल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्याच पतीने केला आहे.

पती ती ( Ti) यांनी यासंदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ समोर आणले आहेत. सदर व्हिडिओ चीनच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जागतिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.ती यांनी सांगितलं की, 'साधू फ्रा महा याला आम्ही अनुकंपा म्हणून एक वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं.' साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

फ्रा याला घरी आणल्यानंतर ती यांना सुरुवातीला काही वाटलं नाही. पण, काही काळाने फ्रा आणि पत्नी प्रापपोर्न यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचं त्यांना लक्षात येऊ लागलं. डेली मेलनुसार, ती यांना संशय तेव्हा बळावला जेव्हा ते अनपेक्षितपणे घरी आले. ते बँकॉक ते सुखोथाई हा पाच तासाचा प्रवास करणार होते. पण, काही कारणास्तव त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि त्यांना घरी परत यावं लागलं होतं. पण, घरी येऊन त्यांना धक्काच बसला.

दोघांना एकत्र पकडल्यानंतर मला खूप राग आला, माझा विश्वासघात झाल्यासारखं मला वाटलं. कारण, मी तिला सर्व काही दिलं. मी तिच्यासाठी दागिने घ्यायचो. भेटवस्तू द्यायचो. पण, तरी तिने माझा विश्वासघात केल्याने मला धक्का बसला, असं ती डेली मेलला बोलताना म्हणाले. दिवसेंदिवस त्यांचा संशय बळावत होता, पण एकेदिवशी त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर सर्व सत्य समोर आलं.

ती यांनी पत्नी आणि त्यांच्या दत्तक मुलाच्या संबंधांचा व्हिडिओ शूट केला आहे. तेव्हा जे घरी पोहोचले तेव्हा ते बेडशीटमध्ये होते. ती यांनी बेटशीट हटवलं आणि म्हटलं की आता तुम्ही दोघं खुश आहात का? ती म्हणाले की, मी समोरचे दृश्य पाहून रागाने फणफणत होतो. दरम्यान, प्रापपोर्न या सुखोताईच्या प्रसिद्ध राजकारणी आहेत.सुखोताई हा मध्ये थायलंडमधला एक प्रांत आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा आहेत. शिवाय त्या डेमोक्रेटिक पार्टीच्या सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT