ग्लोबल

Hyundai पाकिस्तानचा आगाऊपणा कोरियाला नडला; भारताकडे व्यक्त केला खेद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ह्युंदाई पाकिस्तानने केलेल्या ट्विटचा वाद आता सोशल मीडियावरुन राजकीय पातळीवर गेला आहे. भारताकडून याबाबत अधिकृतरित्या नाराजी व्यक्त करण्यात आली असून रिपब्लिक ऑफ कोरियाला यासंदर्भात समन्स देखील पाठवण्यात आले आहेत. ही कंपनी साऊथ कोरियाची असल्यामुळे कोरियाला यासंदर्भात खेदही व्यक्त करावा लागला आहे. ह्युंदाई पाकिस्तानने 'आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया.' असं म्हणत एकप्रकारे काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं थेट भाष्य करणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला भारतातून जबरदस्त विरोध करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण आता राजनैतिक पातळीवर पोहोचलेलं आहे. (Hyundai Pakistan)

रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राजदूतांना (Ambassador of Republic of Korea) परराष्ट्र मंत्रालयाने काल सोमवारी बोलावलं होतं. ह्युंदाई पाकिस्तानने (Hyundai Pakistan) केलेलं सोशल मीडिया पोस्टवर सरकारकडून तीव्र नाराजी त्यांना कळवण्यात आली. तसेच ही पोस्ट अत्यंत अस्वीकार्य असल्याचं सांगण्यात आलं. हा मुद्दा भारताच्या प्रादेशिक अखंडतेशी संबंधित आहे ज्याबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं.

तसेच रिपब्लिक ऑफ कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी आज सकाळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला. त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी कोरियाकडून परराष्ट्र मंत्र्यांना सांगण्यात आलं की, सोशल मीडिया पोस्टमुळे लोकांना आणि भारत सरकारचे मन दुखावलं गेल्याबद्दल त्यांना खेद वाटतो.

काय आहे हे प्रकरण?

अधिकृत ट्विटर हँडलवरुन (@PakistanHyundai) नुकतंच एक असं ट्विट करण्यात आलंय हा मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान ह्युंदाईने ट्विट करत म्हटलंय की, "आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया. ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना आपण त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया, असं म्हटलं आहे. यासोबतच या ट्विटमध्ये दाल सरोवरातील एका बोटीचे छायाचित्र आहे आणि त्यावर 'काश्मीर' हे नाव लिहून काटेरी तारेने जोडले गेल्याचं दाखवण्यात आलंय. हे चित्र आणि हे ट्विट मोठ्या वादात सापडलं असून त्यानंतर ह्युंदाईवर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. (Boycott Hyundai)

'काश्मीर एकता दिवस' (Kashmir Solidarity Day) म्हणजेच काल 5 फेब्रुवारी रोजी ही पोस्ट करण्यात आली आहे. भारताचा भूभाग असणाऱ्या काश्मीरचे खुलेआम विभाजन करण्याची मागणी करणारी ही पोस्ट ह्युंदाईने काल प्रसारित केली आहे. त्यानंतर काही नेटकऱ्यांचं त्या ट्विटकडे लक्ष गेलं आणि त्यांनी या ट्विटविरोधात मत मांडायला सुरुवात केली. त्यानंतर आता #BoycottHyundai हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.

या ट्विटमधून एकप्रकारे भारताचा अपमान झाला असल्याची तक्रार लोकांनी लावून धरली आहे. एका वृत्तानुसार अशी माहिती समोर आली आहे की, जेव्हा भारतातील संतप्त नेटकऱ्यांनी Hyundai India ला या वादग्रस्त ट्विटबद्दल कळवले आणि तुम्ही या ट्विटचं समर्थन करता का? असा सवाल केला तेंव्हा त्यांनी ह्युंदाई इंडियाने त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना ब्लॉक करण्यास सुरुवात केली. तशी तक्रारही अनेक नेटकऱ्यांनी स्क्रीनशॉटसहित केली आहे. (Hyundai India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT