Pakistan Imran khan सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

सत्तेत असताना धोकादायक नव्हतो, पण आता.. इम्रान खान यांचा इशारा

न्यायालये रात्री का उघडली? आपण काही कायदे मोडले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

निनाद कुलकर्णी

इस्लामाबाद : सत्तेतून बेदखल झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनंतर पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी आपण पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनतील, असा इशारा दिला आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांची बुधवारी पाकिस्तानातील पेशावर (Peshawar) येथे रॅली आयोजन केली होती. त्यात ते बोलत होते. यावेळी आपण जेव्हा "सरकारचा भाग होतो तेव्हा धोकादायक नव्हतो, पण आता अधिक धोकादायक होईन." असे विधान त्यांनी केले आहे. (Imran Khan News)

या कारणामुळे रात्रीच्यावेळी उघडण्यात आले न्यायालय?

पंतप्रधानपदावरून हटवण्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, त्यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर (Motion of no confidence) करण्यापूर्वी मध्यरात्री न्यायालये का उघडली गेली, असा सवालही त्यांनी केला. 9 एप्रिल रोजी, पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय (Pakistan High Court) इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी निर्धारित केलेल्या अंतिम मुदतीबाबत याचिकेवर सुनावणीसाठी रात्री उशिरा तयार होते. मात्र, असेंब्लीचे तत्कालीन अध्यक्ष असद कैसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही मध्यरात्री मतदान घेतले नव्हते.

याशिवाय इस्लामाबाद उच्च न्यायालयदेखील मध्यरात्रीच्या सुमारास दुसऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी उघडण्यात आले होते. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या सर्व घटनांबाबतदेखील इम्रान खान यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत खान यांनी “न्यायालये रात्री उघडण्यात का आली ? आपण काही कायदे मोडले का?" असे प्रश्न उपस्थित करत आपण संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधीही लोकांना संस्थांविरुद्ध भडकावले नसल्याचे म्हंटले आहे.

'आयात केलेले सरकार स्वीकारणार नाही'

यावेळी इम्रान खान यांनी 'इम्पोर्टेड' असा उल्लेख केलेले नवे सरकार स्वीकारले जाणार नाही, असेही इम्रान खान म्हणाले. "आम्ही आयात केलेले सरकार स्वीकारणार नाही आणि लोकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने करून त्यांना काय हवे आहे ते दाखवून दिले आहे," असे ते म्हणाले. देशात प्रत्येक वेळी एखाद्या नेत्याची हकालपट्टी झाली, तेव्हा लोकांनी जल्लोष केला, पण यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील आपले सरकार हटवण्यात परकीय राष्ट्रांचा सहभाग होता, असे इम्रान खान सातत्याने सांगत आले असून, यावेळीदेखील त्यांनी अमेरिकेने हे डाकू (नवीन सरकार) देशावर लादून पाकिस्तानचा अपमान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: कधी लागणार आचारसंहिता? तीन टप्यात कशा होणार निवडणुका? मोठी माहिती आली समोर

Hasan Mushrif : जनता दलामुळे गडहिंग्लजचे वाटोळे, हसन मुश्रीफांचा घाणाघात; कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेत राजकारण तापणार

iPhone Discount : बंपर ऑफर! iPhone 16 Plus वर चक्क 25 हजारचा डिस्काउंट, खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा, 'या' ठिकाणी सुरुय जबरदस्त ऑफर

Mumbai Rain Alert: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार, मुंबईसह १२ जिल्ह्यांत धो-धो कोसळणार; यलो अलर्ट जारी

INDW vs SA W World Cup Final: टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार? एक डाव आपल्यावरच पडू शकतो भारी, दक्षिण आफ्रिकेला...

SCROLL FOR NEXT