न्यूयॉर्क - कोरोना जागतीक साथीमुळे हजारो स्थलांतरित नागरिक जगभरात विविध ठिकाणी अडकले असून त्यांना संसर्ग होण्याचा तीव्र धोका असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे महासंचालक अँटनिओ व्हिटोरीनो यांनी हा इशारा दिला आहे.
स्थलांतरित हे संसर्गाचे वाहक असल्याचा सर्रास समज असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतरच्या काळात कृषी आणि सेवा क्षेत्रांत स्थलांतरितांना हटविल्यास अर्थव्यवस्था सावरण्यावर प्रतिकूल परिणामाची भीती त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आता प्रवासाचे निर्बंध बरेच कठोर केले जातील. भविष्यात त्याचा स्थलांतरितांविरुद्ध प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही देशांनी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीबाबतची स्थिती तपासून तसा तपशील डिजिटल स्वरूपात ठेवण्याची पद्धत सुरु केली आहे. मोबाईल अॅपही वापरली जात आहेत.
भारतीय आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का? एच-१ बी व्हिसावर बंदी घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाच्या हालचाली
अनेक देशांत स्थलांतरितांची मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्स या रोगांबाबत तपासणी केली जाते. त्यात आता कोरोनाची भर पडेल. नियमित स्थलांतर करणाऱ्यांबाबत आरोग्याबाबतचे निर्बंध वाढतील. प्रवासावरील निर्बंधांमुळे स्थलांतरितांची स्थिती नाजूक झाली असून उपजीविकेसाठी काम करणे त्यांना अशक्य ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थलांतरितांसाठी कार्य करण्याची परवानगी मानवतावादी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी विविध देशांच्या सरकारकडे करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगभरातील स्थिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.