Maldivian government mohamed muizzu: 
ग्लोबल

Maldives Muizzu: मुइझ्झु यांच्याविरोधात आणला जाणार महाभियोग प्रस्ताव? मालदीव सरकारमध्ये गोंधळ का सुरुय?

Maldivian government mohamed muizzu: भारत विरोधी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झु यांना आपल्या देशातच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती यासाठी कारणीभूत ठरत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारत विरोधी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झु यांना आपल्या देशातच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यांनी विरोधी खासदारांना संसदेत येण्यापासून रोखलं आहे. तसेच चार कॅबिनेट सदस्यांना विरोधी पक्षाची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे मालदीच्या संसदेत मोठा गोंधळ झाला. थेट संसद सदस्यांमध्ये हाणामारी झाली.( impeachment motion to be brought against mohamed muizzu Why is the Maldivian government in trouble)

मुइझ्झु यांच्या खासदारांना देखील मारहाण झाली आहे. विरोधी पक्षांनी मुइझ्झु यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. विरोधक त्यांच्याविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मिइझ्झु यांच्याविरोधात महाभियोग चालवला जाणार असून आपल्याकडे त्यासाठी पुरेसे समर्थन असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे भारताला विरोध करणाऱ्या मुइझ्झु यांना देशातून मोठा विरोध होत असल्याचं दिसत आहे.

मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाजवळ सर्वाधिक खासदार आहेत. पक्षाने दावा केलाय की मुइझ्झु यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी आवश्यक खासदारांनी स्वाक्षरी केलीये. त्यामुळे लवकरच त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात येईल. मात्र, अद्याप विरोधी पक्षांनी प्रस्ताव तयार केलेला नाही.

संसदेत गोंधल कशामुळे

एका दिवसापूर्वी मालदीव संसदेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये सत्ताधारी विरोधी पक्षाचे खासदार भिडले होते. त्यांच्यात चांगलीच मारामारी झाली होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कॅबिनेट सदस्यांच्या निवडीवरुन मतभेद आहेत. एमडीपीने चार सदस्यांना मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे मुइझ्झु यांच्या खासदारांनी संसदेत आंदोलन सुरु केले. तेव्हा अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम शाहीम आणि अहमद ईसा हे एकमेकांत भिडले.

एमडीपी आणि डेमोक्रेट्स पक्षाने ठरवलं होतं की मुइझ्झु कॅबिनेटच्या चार सदस्यांना मंजुरी देणार नाही. मालदीवमध्ये मुइझ्झु यांचे महामाघाडीचे सरकार आहे. त्यामुळे त्यांना पुरेशा खासदारांचे समर्थन मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाने संसद अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. अध्यक्ष आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून एका विशिष्ट पक्षाला समर्थन देत आहेत, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT