imran khan ex wife reham khan tweet on deadly attack on pak ex pm  
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पूर्व पत्नीचं ट्विट, म्हणे...

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला . गुजरांवाला लाँग मार्च दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाला. इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ज्यात त्यांच्या दोन्ही पायात गोळ्या लागल्या आहेत. यानंतर त्यांना लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. अशा परिस्थितीत त्याची माजी पत्नी रेहम खाननेही याचा निषेध केला आहे.

रेहम खानने ट्विट करून हल्ल्याचा निषेध केला आणि पीटीआय अध्यक्ष इम्रान खान आणि पक्षाच्या इतर सदस्यांवर झालेला गोळीबार धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. आमच्या सर्व राजकारण्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरक्षा प्रांतीय/संघीय संस्था आणि आमच्या एजन्सींनी सुनिश्चित केली पाहिजे. रेहान खान यांनी इम्रान खानव यांच्यावर वेळोवेळी घणाघाती आरोप केले असले, तरी या दु:खाच्या वेळी त्याने सहानुभूतीपूर्ण संदेश दिला आहे.

इम्रान खानविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आले तेव्हा रेहम खान यांनी पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला, विशेषत: महिला अधिकाऱ्याला धमकावल्याबद्दल इम्रान खानला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली होती.

दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पंजाब प्रांतात गुरुवारी निषेध मोर्चादरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या पायाला गोळी लागली, मात्र ते धोक्याबाहेर आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्याचवेळी एएफपीच्या वृत्तानुसार, इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, हल्लेखोराने अटक केल्यानंतर सांगितले की, तो इम्रान खानला मारण्यासाठी आला होता. तसेच सांगितले की, माजी पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत आहेत, ज्यांना शिक्षा देण्यासाठी तो आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT