Pakistan PM Imran Khan on India esakal
ग्लोबल

पाकने पुन्हा आळवला ‘काश्‍मीर राग’; ‘OIC’मध्ये खंत व्यक्त

इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बैठकीत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बैठकीत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्‍मीर प्रश्‍नी भारतावर कोणाचाही दबाव नसल्याची खंत त्यांनी इस्लामीक सहकार्य परिषदेत (ओआयसी) व्यक्त केली.

‘ओआयसी’ची परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठक आज इस्लामाबादमध्ये झाली. या बैठकीत इम्रान खान यांनी काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला. ‘आपण संघटना म्हणून काश्‍मीर आणि पॅलेस्टाइन या दोन्ही प्रश्‍नांवर अपयशी ठरलो आहोत. कारण आपल्यातच मतभेद आहेत, हे त्या दोघांना (भारत आणि इस्राईल) माहिती आहे,’ असे इम्रान खान म्हणाले. भारत सरकारने ३७० वे कलम रद्द केल्याचा संदर्भ देत इम्रान म्हणाले की, या मुद्द्यावरून भारतावर कोणताही दबाव आणता आलेला नाही. हा दबाव आणण्यासाठी इस्लामिक देशांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याची गरज नाही. मात्र, आपण एकत्र नसलो तर अशा घटना घडत राहतील.

इम्रान खान यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले असतानाच त्यांनी ‘काश्‍मीर राग’ आळवलाे. येत्या काही दिवसांत त्यांच्याविरोधात संसदेत अविश्‍वास ठराव मांडला जाणार आहे. भारतानेही, ‘काश्‍मीर हा भारताचा अविभाग्य भाग होता, आहे आणि भविष्यातही राहिल,’ असे वारंवार स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने हे वास्तव स्वीकारावे आणि भारतविरोधी प्रचार थांबवावा, असे आवाहनही भारताने केले आहे. अमेरिका, चीनसह अनेक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रांनीही, हा द्वीपक्षीय प्रश्‍न असल्याचे स्पष्ट करूनही पाकिस्तान संधी मिळेल तेथे हा मुद्दा उपस्थित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT