Elon Musk News Sakal
ग्लोबल

Twitterची मोठी कारवाई! पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात केलं ब्लॉक

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर तिसऱ्यांदा कारवाई

सकाळ डिजिटल टीम

जेव्हापासून एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी स्विकारली तेव्हापासूनच ट्विटर या-ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरने आपल्या पॉलिसीमध्ये अनेक फेरबदल केल्याचे दिसून येत आहेत. अशातच आता ट्विटरने मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केलं आहे.

ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीनंतर ट्विटर हँडल ब्लॉक करावे लागते.

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणामध्ये भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलं आहे की, "भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे."

Pakistan Twitter account

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्याची ही आत्तापर्यंतची तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागलं होतं. आता पुन्हा ट्विटरने भारतात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा', कोल्हापुरातील गावागावात संयुक्त बैठका; 'या' गावांना महापुराचा मोठा धोका

Girish Mahajan controversy: भाजपच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल

Latest Marathi News Live Update : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बारामतीत ५८.२७ टक्के, तर राहुरीत ५६.२० टक्के मतदानाची नोंद

Baramati Election: मतदानाच्या दिवशीही राजकीय घडामोडी; कार्यकर्त्यांकडून जिवाचे रान, सकाळपासूनच बारामती केंद्रावर रांगा!

Kolhapur circuit bench : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठ, मुख्य न्यायमूर्ती दिला विश्वास; तरूण वकिलांना संधी

SCROLL FOR NEXT