Navy  esakal
ग्लोबल

Navy : 'आयएनएस जटायू’चा नौदलात समावेश

नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत लक्षद्वीपमध्ये कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

मिनिकॉय (लक्षद्वीप) ः भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे ‘आयएनएस जटायू’ या तळाचा बुधवारी नौदलात औपचारिकरीत्या समावेश करण्यात आला. सध्या चीन व मालदिवबरोबर भारताचे संबंध ताणलेले असून नौदलाच्या या नव्या तळामुळे भारताची सागरा ताकद वाढणार आहे.

‘आयएनएस जटायू’मुळे नौदलाला पश्चिम अरबी समुद्रातील चाचेगिरी आणि अमली पदार्थ विरोधी कारवाया आता सुलभपणे करता येतील. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते या तळाचा समावेश आज नौदलात करण्यात आला. कमांडंट व्रत बघेल हे ‘आयएनएस जटायू’चे नेतृत्व करणार आहेत.

मिनिकॉयमधील कार्यक्रमानंतर बोलताना ॲडमिरल कुमार म्हणाले, रामायण या ऐतिहासिक महाकाव्यातील जटायू या पक्षाचे नाव नौदलाच्या नव्या तळाला दिले आहे. रामायणात सीतेच्या अपहरणाला जटायूने पहिल्यांदा विरोध केला होता. स्वत:च्या जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्रथम प्राधान्य देण्याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच या नौदलाच्या तळाचे नामकरण ‘जटायू’ असे केले आहे. संरक्षण, पाळत ठेवणे आणि निःस्वार्थ सेवेच्या भावनेचा हा सन्मान आहे.’

‘‘जटायूने ​​प्रभू रामाला दिलेली माहिती महत्त्वपूर्ण माहिती दिल्याने त्यांचे शोधकार्य यशस्वी झाले. त्याचप्रमाणे हे जहाज भारतीय नौदलाला संपूर्ण प्रदेशाची वास्तव सागरी माहिती पुरवेल. पूर्वेकडे ‘आयएनएस बाझ’ आणि आता पश्‍चिमेकडे ‘आयएनएस जटायू’ देशहिताचे रक्षण करण्यासाठी नौदलाचे डोळे आणि कान म्हणून काम करेल,’’ असा विश्वास नौदल प्रमुखांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

Taj Mahal: जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला जाताय? सावधान! माकडांचा धुमाकूळ, पर्यटकांवर हल्ले

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: अशैक्षणिक कामे थांबवा, शिक्षकांना त्यांचे मूळ काम करू द्या!

SCROLL FOR NEXT