taliban sakal
ग्लोबल

तालिबानने मान्य केलं भारताचं महत्त्व आणि म्हटलं....

तालिबान पाकिस्तानसोबत असून त्यांचा भारताला विरोध असल्याच्या बातम्या येत आहेत.

दीनानाथ परब

काबूल: तालिबानने (taliban) भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची तयारी दाखवली आहे. तालिबानने भारताचं महत्त्व मान्य केलं आहे. भारत या प्रदेशातील एक महत्त्वाचा देश आहे. अफगाणिस्तानात (Afganistan) सत्तेवर येणाऱ्या नव्या राजवटीपासून (new regime) त्यांना कोणताही धोका नसेल, असे तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद (Zabihullah Mujahid) यांनी म्हटले आहे. जबिहुल्ला मुजाहिद यांनी भारताचे अफगाणिस्तानसोबत असलेल्या चांगल्या संबंधांचा दाखल दिला आहे.

तालिबानच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत असून त्यांचा भारताला विरोध असल्याच्या बातम्या येत आहेत, त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जबिहुल्ला मुजाहिद यांनी "यामध्ये अजिबात तथ्य नाही. आमच्यापासून भारताला कोणताही धोका नाही, याची आम्ही खात्री देतो" असे जबिहुल्ला म्हणाले.

तालिबानने याआधी अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर आम्ही आमच्या भूमीचा दुसऱ्या देशाविरोधात कोणालाही वापर करु देणार नाही, असे म्हटले आहे. त्यांचा रोख पाकिस्तानकडे होता. "अन्य देशांचे दूतावास अफगाणिस्तानात सुरु राहिले पाहिजेत. अफगाणिस्तानता अन्य देशांचे राजदूत राहिले, तर त्याचा फायदाच आहे. सगळ्या देशांसोबत आम्हाला चांगले संबंध हवे आहेत" असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT