India And Central Asia Meeting Sakal
ग्लोबल

अफगाण जनतेला मदत आवश्‍यक; भारत-मध्य आशिया चर्चेत सूर

अफगाणिस्तानमधील जनतेला मानवतावादी दृष्टीकोनातून तातडीने मदत करणे आवश्‍यक असल्याची भूमिका आज भारत आणि मध्य आशियातील पाच देशांनी घेतली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) जनतेला मानवतावादी दृष्टीकोनातून तातडीने मदत करणे आवश्‍यक असल्याची भूमिका आज भारत (India) आणि मध्य आशियातील (Central Asia) पाच देशांनी घेतली. दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण, अर्थपुरवठा या कारणांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये, असे आवाहनही या देशांनी केले. भारताने आयोजित केलेल्या तिसऱ्या भारत-मध्य आशिया चर्चेमध्ये कझाखस्तान, किरगिझीस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तान या पाच देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे चर्चेच्या अध्यक्षस्थानी होते. अफगाणिस्तानमधील जनतेला मानवतावादी दृष्टीकोनातून तातडीने मदत करणे आवश्‍यक असल्याचे यावेळी मान्य करण्यात आले. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार या देशात दहशतवादाला पाठबळ देणे आणि त्यांना आश्रय देणे या गोष्टींना बंदी आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांसाठी संबंधितांना जबाबदार ठरवावे, अशी मागणी करण्यात आली. दहशतवाद्यांना आश्रय देणे, दहशतवाद पसरविणे, त्यांना आर्थिक बळ देणे आणि कट्टरतवादाचा प्रचार करणे, या बाबी मानवतेच्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विरोधात आहेत, यावर चर्चेमध्ये एकमत झाले.

विविध मुद्द्यांवर चर्चा

दोन देशांना दळणवळण यंत्रणेद्वारे जोडणाऱ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, समान सहभाग, स्थानिक गोष्टींना महत्त्व, एकमेकांच्या स्वायत्ततेचा आदर आणि आर्थिक स्थैर्य या बाबींना महत्त्व दिले जावे, या मुद्द्यावरही चर्चेमध्ये भर देण्यात आला. तसेच, अफगाणिस्तानमधील महिलांची स्थिती, लहान मुले आणि अल्पसंख्याकांचे हक्क यावरही चर्चा झाली. आपले सर्वांचे अफगाणिस्तानबरोबर प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या देशाबाबत सर्वांनाच सारखीच काळजी वाटत आहे. त्यामुळे अफगाण जनतेला मदत करण्यासाठी आपण मार्ग काढायलाच हवा, असे जयशंकर यावेळी म्हणाले.

जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे आपापसांतील सहकार्य वाढविण्यासाठी व्यापार, क्षमता विकसन, दळणवळण आणि संपर्क यांच्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.

- एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT