नवी दिल्ली :लडाखच्या मुद्यावरुन भारत-चीन यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. लडाखमधील गलवान येथे चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आल्याने दोन्ही देशातील सीमावाद पुन्हा उफाळला असल्याची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशातील हा तणाव चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवत चीनने दुसरीकडे तिबेटमध्ये सैन्याचा लष्करी सराव केला होता. त्यामुळे चीनच्या या खेळीस भारताने प्रत्युत्तर देत, ऑस्ट्रेलिया सोबत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी मजबूत करण्याचे ठरवले आहे. यानुसार भारत ऑस्ट्रेलिया सोबत संरक्षण (डिफेन्स म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट) करार करण्यात आला.
भारत-ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील ऑनलाइन शिखर परिषद आजपासून सुरू झाली. या द्विपक्षीय चर्चेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला संरक्षणविषयक करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी भारताने असाच करार अमेरिकेसोबत केला होता. ज्या अंतर्गत लष्करी जहाजे आणि विमाने एकमेकांच्या संरक्षण तळांवर देखभाल दुरुस्तीसाठी तसेच इंधन आणि रसद भरण्यासाठी प्रवेश करू शकतात.
भारत, अमेरिका आणि जपान यांच्यात दरवर्षी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात होणाऱ्या संयुक्त नौदल युद्ध अभ्यासात यावेळी ऑस्ट्रेलियाला देखील सहभागी करण्यासंदर्भात भारत विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी 2007 मध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त नौदल युद्ध अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळी चीनने या संयुक्त नौदल युद्ध अभ्यासावरून नाराजी व्यक्त केली होती. चीनमधील वुहान शहरातून जगभर संसर्ग झालेल्या कोरोना विषाणू संदर्भात तपास करण्याची मागणी ऑस्ट्रेलियाने जागतिक आरोग्य संघटनेत (डब्लूएचओ) केली होती. ऑस्ट्रेलियाच्या या मागणीला चीनने विरोध दर्शवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.